Wednesday, December 6, 2023

पत्नीसोबत घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय हनी सिंग, जाणून घ्या एका क्लीकवर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर आणि संगितकार म्हणनून ओळखला जडाणारा गायक  हनी सिंग याने आपल्या दमदार गायिकिने अनेक प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आजही त्याच्या गाण्याला कोणत्याच रॅपरचा तोड नाही. नुकतंच हनी सिंग दिल्लीमधील पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये भलत्याच अभिनेत्रासोबत पाहायला मिळाला आहे. काही दिसांपूर्वीच त्याची पूर्व पत्नी शालिनी तलवार हिच्यासोबत घटस्फोट झाला. मात्र, यावेळेस तो भलत्याच अभिनेत्रासोबत दिसला असून यांचा व्हिडिओदेखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सिंगर आणि रॅपर हनी सिंग (Yo Yo Honey Singh) दिल्ली मधील अयोजीत केलेल्या एका इवेंट मध्ये आपली गर्लफ्रेंड टीना थडानी (Tina Thadani) सोबत पोहचला. या पार्टीमध्ये देघेही एकमेकांच्या हातहत घालून पाहायाल मिळाले, ज्यामुळे पार्टीमधील अनेकांचे लक्ष या जोडीने वेधले. यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.रॅपर हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांसाठी चर्चेत असतो, मात्र या वेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेचा विषय बनत आहे. रॅपच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. शालिनी तलवार सोबत घटस्फोट घेतल्यानंतर हनी सिंगला आता मॉडेल टिना थडानी हिला डेट करत असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीतील इवेंटमध्ये हनी सिंग ला त्याची गर्लफ्रेंड टीना सोबत स्पॉट केले होते. तिथे सर्वांच्या समोर तो तिचा हात पकडुन थांबलेला दिसून आला. दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले, यांना पाहूण असे दिसून येते की त्याने त्यांच्या नात्याला जगजाहीर केले आहे. पार्टीमध्ये हनी सिंग पांढऱ्या रंगाचा शर्ट,काळ्या रंगाची पॅन्ट,आणि ब्लेजर अश्या हैंडसम लुक मध्ये दिसला. तसेच टीना ने देखील काळी थाई हाई स्लिट ड्रेस मध्ये स्टनिंग लुक मध्ये दिसून आली. तिच्या हातात चाहत्यांनी एक महागडी पर्स देखील पाहीली,ज्याची किंमत 2.5 लाख असल्याची चर्चा सुरु आहे.

सोशल मिडीयावर चाहते यांच्या व्हिडीओ वर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “वाह भाउ तुझी तर मज्जा आहे, मी फारच खुश आहे तुम्हाला खुश बघुन नव्या गर्लफ्रेंड साठी शुभेच्छा.” दुसऱ्या युजरने लिहिले, बायको खरं बोलत होती ,तुला गर्लफेंड आहे.” तितेच एका युजरने लिहीले की, “म्हणुनच घटस्फोट झाला,जेणे करुन नविन गर्लफ्रेंड सोबतचे नाते जगासमोर आणता येईल.”

हनी सिंगला जुन्या लtक मध्ये पाहून चाहते खुश झाले आहेत. असे बोलले जाते की, हनी सिंग सोबतच्या मॉडल चे नाव टीना ठठानी असे असून, ती त्याच्या सोबत ‘पॅरिस का ट्रिप’ या गाण्यात दिसुन आली. हनी सिंगचा शालिनी तलवार सोबत 2022 साली घटस्फोट झाला.शालिनी ने हनी सिंर वर गंभीर आरोप लावले होते. तिने सांगितले की, हनी सिंग ने तिच्या बरोबर मारहान केली, त्यासोबतच धोका करुन पैशांचा फ्रॉड केल्याचे देखील सांगितले. मात्र, हनी सिंगने हे सगळे आरोप खोटे असल्याचे सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
मुलीचं चित्रपटात काम करणं सुपरस्टार धर्मेंद्रला खटकलं, 6 महिने बोलणंच केलं होतं बंद
धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी

 

हे देखील वाचा