Saturday, June 29, 2024

पुन्हा विचार कर… ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र यांना धक्का

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिचा ११ वर्षांचा संसार मोडला आहे. ईशाने भरत तख्तानी याला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर खुद्द ईशा आणि भरत यांनी स्टेटमेंट जारी करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. मात्र, तिच्या या निर्णयामुळे वडिल धर्मेंद्र यांना मोठा धक्का बसला आहे. चिंता व्यक्त करत त्यांनी ईशाला पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे धर्मेंद्र चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. देओल कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे. “कोणाच्याही आईवडिलांना मुलांचा मोडलेला संसार बघायला आवडत नाही. धर्मेंद्रसुद्धा एक वडील आहेत. आणि आता त्यांचं दु:ख कोणीही समजू शकत नाही. ईशाने घेतलेल्या निर्णयाच्या ते विरोधात आहेत, असं नाही. पण, तिने याचा पुन्हा एकदा विचार करावा, असं धर्मेंद्र यांचे मत असल्याचे जवळच्या व्यक्तीने सांगितले.

ईशा आणि भरतने २०१२ साली विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यात दुरावा आला होता. त्यांच्यात अनेक मतभेदही होती. त्यामुळे सुखी संसाराच्या ११ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत ईशा हिने भरत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे…हा निर्णय आमच्या मुलींसाठी फार महत्त्वाचा होता.’ असं ईशानं म्हटलं आहे. त्यांच्या मुलींचं नाव राध्या आणि मिराया असं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर, पोस्ट शेअर करत म्हणाला…
जीवांच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण ‘अमलताश’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा