Monday, June 24, 2024

‘ताज रॉयल ब्लड’ या सिरीजमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्याला ओळखले का? नाव ऐकाल तर व्हाल अवाक

बॉलिवूडमधील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते म्हणून ‘धर्मेंद्र’ ओळखले जातात. ऍक्शन, ड्रामा यासोबतच जिवंत अभिनयासाठी हीमॅन यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. मुख्य नायकापासून, सहायक नायकापर्यंत अनेक भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या. आता लवकरच ते ‘ताज रॉयल ब्लड’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये ते शेख सलीम चिश्ती ही भूमिका निभावताना दिसणार असून, नुकताच त्यांनी या सिरीजमधला त्यांचा लूक सर्वांना दाखवला आहे. हा लूक पाहून आपण त्यांना ओळखू देखील शकणार नाही.

नुकतेच धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या आगामी सिरीज ‘ताज रॉयल ब्लड’ मधील त्यांच्या भूमिकेचा असून यात ते शेख सलीम चिश्ती ही भूमिका साकारणार आहे. त्यांचा हा लूक अतिशय सजीव आणि उत्तम असून, यात धर्मेंद्र यांना ओळखता येणे निव्वळ अशक्य झाले आहे. हा फोटो शेअर करताना धर्मेंद्र यांनी लिहिले, “हॅलो मित्रांनो, मी ताज सिनेमात शेख सलीम चिश्ती एक सुफी संत यांची भूमिका साकारत आहे. ही एक छोटी मात्र अतिशय महत्वाची भूमिका आहे. तुमच्या शुभेच्छांची मला खूप गरज आहे.”

धर्मेंद्र यांचा हा फोटो आणि नवीन लूक सध्या सर्वत्र चांगलाच गाजत असून, या सिनेमात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा एका काल्पनिक कथेवर आधारित असून, यात नसीरुद्दीन शाह मुघल शासक अकबर यांची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस १६ नंतर झालेल्या पार्टीमध्ये सलमान खानने केली शिव ठाकरेशी चर्चा, वाचा काय म्हणाला दबंग खान
आता विवेक अग्निहोत्री बनले शारूखचे फॅन, ‘पठाण’चे यश पाहून ‘किंग’वर उधळली स्तुतीसुमने

हे देखील वाचा