Wednesday, March 29, 2023

आता विवेक अग्निहोत्री बनले शारूखचे फॅन, ‘पठाण’चे यश पाहून ‘किंग’वर उधळली स्तुतीसुमने

बॉलिवूडच्या किंग खानचा ‘पठाण’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये तोबा गर्दी खेचत अमाप यश आणि पैसा कमवत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच ‘बॉयकॉट’ होणार पठाण नक्कीच चालेल की नाही अशी साशंका अनेकांच्या मनात होती. मात्र सर्व अडथळे दूर सासरच्या या सिनेमाने न भूतो न भविष्यती असे यश मिळवले आहे. जे लोकं शाहरुख संपला असे म्हणत होते आता तेच लोकं त्याची स्तुती करताना थकत नाही. शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर धमाकेदार पदार्पण केले. आज त्याला मिळत असलेल्या या यशामुळे अनेकांची त्याच्याबद्दलची मते बदलली आहे. असे एक आहेत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. २०२२ वर्षातील सुपरहिट अशा द काश्मीर फाइल्स या सिनेमाचे ते दिग्दर्शक. विवेक यांनी नुकतेच शाहरुख खानच्या पठाणवर एक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे तर सध्या तुफान चर्चेत आले आहे.

विवेक अग्निहोत्री यांना नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्ता स्वभावामुळे ओळखले जाते. कोणत्याही गोष्टीवर मत मांडताना ते मागेपुढे बघत नाही. जे असेल ते स्पष्ट बोलतात. नुकतीच त्यांनी मीडियामध्ये एक मुलाखती दिली. यात त्यांनी पठाणला मिळालेल्या यशावर भाष्य केले. त्यांनी या सिनेमाबद्दल आणि सिनेमाच्या यशाबद्दल बोलताना सांगितले, “पठाणच्या यशाचे श्रेय नक्कीच शाहरुख खानला जाते. शाहरुखने ज्या यापद्धतीने त्याच्या चित्रपटासाठी प्लँनिंग केले, मार्केटिंग केली ती खरंच कौतुकास्पद आहे. एक सुपरस्टार म्हणून त्याने हे दाखवून दिले की, हा सिनेमा माझा आहे आणि मीच त्याची संपूर्ण जबाबदारी घेणार. कदाचित याच कारणामुळे पठाण ब्लॉकबस्टर ठरला आहे.”

यासोबतच त्यांनी पठाणच्या बॉयकॉट ट्रेंडवर बोलताना सांगितले, “दुसरीकडे पठाणच्या यशाचे श्रेय बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडला देखील जाते. त्यांनी ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या चित्रपटाचा विरोध केला त्यामुळे त्यांना वाटले सिनेमाबद्दल काही नकारात्मक घडेल. मात्र त्यांचे दुर्दैव असे काहीच घडले नाही. त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटा पडला. आणि पठाणला याचा चांगलाच फायदा झाला.”

विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाइल्स या सिनेमातून कासमोर पंडितांवर भाष्य केले. ९० च्या दशकात त्यांच्यावर जो अत्याचार झाला तेच या सिनेमातून दाखवले गेले. सिनेमा हिट झाला असला तरी सिनेमाबाबत दोन ग्रुप तयार झाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो

हे देखील वाचा