Saturday, July 6, 2024

आजारी असल्याच्या बातम्यांदरम्यान धर्मेंद्र यांनी शेअर केला व्हिडिओ; म्हणाले, ‘मी शांत आहे, पण…’

नुकतेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. या बातमीत अभिनेत्याची प्रकृती खालावली असल्याचा दावा करण्यात आला होता. अभिनेत्याची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येताच, त्यांचे चाहते चिंतेत पडले. पण या बातम्यांदरम्यान धर्मेंद्र यांनी आता एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ते पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र एक गाणे गात आहेत आणि नंतर ते म्हणतात, ‘मैं चुप हूं बीमार नहीं’. धर्मेंद्रचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

धर्मेंद्र यांच्या या व्हिडिओआधी बॉबी देओलचे एक विधान देखील समोर आले होते. ज्यामध्ये त्याने वडिलांशी संबंधित सर्व अफवा फेटाळून, त्याचे वडील घरी असल्याचे स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, “अभिनेता पूर्णपणे ठीक आहे. त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत आहे. यासाठी मी त्यांच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. तुमचे प्रेम आणि स्नेह असेच राहू द्या.” (Dharmendra shares video after hospitalised rumours)

मे महिन्याच्या सुरुवातीला धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर अभिनेत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओद्वारे खुलासा केला की, त्याच्या पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आल्याने त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “मित्रांनो, जबरदस्तीने गोष्टी करू नका… तुमच्या मर्यादा जाणून घ्या, मी हे केले आणि माझा धडा शिकलो.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर धर्मेंद्र लवकरच करण जोहरच्या (Karan Johar) ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत आलिया भट्ट (Alia Bhatt), रणवीर सिंग (Ranveer Singh), शबाना आझमी (Shabana Azmi) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा