Monday, July 8, 2024

‘यादों की बारात’ चित्रपटाला ४८ वर्षे पूर्ण, सुपरस्टार राजेश खन्नांना टक्कर द्यायचा ‘हा’ अभिनेता

झीनत अमान, धर्मेंद्र, नीतू सिंग यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात एक अभिनेते होते, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर त्यांची एक छाप सोडली होती. ते अभिनेते म्हणजेच विजय अरोरा होय. त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४८ वर्ष पूर्ण झाली आहेत. २ नोव्हेंबर, १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात काम करून विजय यांनी चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. विजय जेव्हा चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा सुपरस्टार राजेश खन्नाही चिंतेत पडले होते. त्यावेळी चित्रपट हिट ठरला होता. ज्यावेळी विजय स्टार झाले होते, तेव्हा त्यांना अनेक मालिका आणि शोमध्ये काम मिळाले होते.

‘यादों की बारात’ या चित्रपटात धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. असे म्हणतात की, नीतू सिंग आणि झीनत अमान यांना या चित्रपटातून खूप ओळख मिळाली होती. यासोबतच विजय अरोरा यांना देखील ओळख मिळाली होती. या हँडसम अभिनेत्याला बघून अनेक मुली त्यांच्यावर फिदा झाल्या होत्या. यावेळी राजेश खन्ना खूप चर्चेत होते. त्यांना टक्कर देणारा कोणीच नव्हता. ‘यादों की बारात’ या चित्रपटानंतर विजय सर्वत्र चर्चेत आले होते.

विजय यांनी रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘रामायण’मध्ये रावणचा मुलगा मेघनादचे पात्र निभावले होते. ७०-८० च्या दशकात मुख्य भूमिकेत आणि सहाय्यक भूमिकेत विजय यांनी अनेक चित्रपटात कामं केली आहेत. चित्रपटात काम करण्याआधी त्यांनी पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी घेतली होती. दुर्दैवाने २००७ मध्ये कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. ७० च्या दशकातील या हँडसम अभिनेत्याने अनेक तरुणींच्या मनावर राज्य केले होते.

सलीम जावेद यांनी ‘यादों की बारात’ या चित्रपटाची कहाणी लिहिली होती. या चित्रपटाला बॉलिवूडमधील पहिला मसाला चित्रपट असे देखील म्हणतात. या चित्रपटातील ‘यादों की बारात’, ‘मेरी तमन्ना’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘हम दिवाना दिल’ ही गाणी सुपरहिट झाली होती, जी आजही अनेकजण आनंदाने ऐकतात. या चित्रपटातील गाण्यांना आर.डी. बर्मन यांनी संगीत दिले होते. तसेच मजरुह सुलतान पुरी यांनी ही गाणी लिहिली होती, तर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी या गाण्यांना त्यांचा आवाज दिला होता. त्यांचे ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे आजही प्रसिद्ध आहे.

या चित्रपटाला खूप यश मिळाले होते. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम या भाषांमध्ये देखील बनवला गेला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईत आला होता शाहरुख, तर आज वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी

-जेव्हा करण जोहरने विचारला होता ‘न्यूड पोझ’बाबत प्रश्न, शाहरुख खानचे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

-खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट

हे देखील वाचा