कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. अशातच आता टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी ‘डान्स दीवाने ३’ या शोमधील जज धर्मेश येलांडे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी या शोमधील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता धर्मेशही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे.
खरं तर नुकतेच असे वृत्त आले होते की, ‘डान्स दीवाने ३’चा जज धर्मेशने पुढील एपिसोडचा भाग होणार नाही. तरीही त्याच्या गैरहजरीचे कारण स्पष्ट केले नव्हते.
या शोच्या तब्बल १८ सदस्य मागील काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त आले होते. या शोमधील प्रसिद्ध कलाकार माधुरी दीक्षित, तुषार कालिया, धर्मेश येलांडे हे जज आहेत, तर राघव जुयाल या शोचे सूत्रसंचालन करतो. निर्मात्यांनी सांगितले की, “आमचा शो ‘डान्स दीवाने ३’शी निगडीत काही सदस्य कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत.”
या रियॅलिटी डान्स शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या शोमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण सेट सॅनिटाईझ केला आहे आणि सर्वांची कोरोना चाचणीही केली जात आहे.
निर्मात्यांनी पुढे बोलताना असेही म्हटले की, “सुरक्षेशी संबंधित सर्व काळजी लक्षात घेतली जात आहे. जिथे सदस्य एकमेकांशी भेटतात, ती संपूर्ण जागा सॅनिटाईझ केली गेली आहे. आम्ही आपल्या सदस्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत सातत्याने लक्ष देत आहोत आणि नियमांनुसार सर्व गोष्टींचे पालन करत आहोत.”
यापूर्वी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये अक्षय कुमार, गोविंदा, विकी कौशल, कॅटरीना कैफ यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-