धुरंदर 2 या चित्रपटाने आतापर्यंत उत्तम कमाई करत अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती.
आदित्य धर (Dhar)दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात भर निर्माण केले आहेत या चित्रपटात सुफी, आंतरराष्ट्रीय आणि बॉलीवूड शैलींचा संगम आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका 36 वर्षे जुन्या गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे आता खूप लोकप्रिय होत आहे.
1990 सालच्या ‘दिल’ या चित्रपटातील ‘हम प्यार करने वाले’ हे गाणे प्रचंड गाजले. माधुरी दीक्षित आणि आमिर खान यांनी यात काम केले आहे. आणि त्या काळात हे गाणे प्रंचड गाजले होते. लोकांना आमिर खान व माधुरीची जोडी खूप आवडली होती. या गाणे उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल या दोन्ही दिग्गज गायकांनी गायले होते. तर या ‘धुरंदर 2’ मध्ये हे गाणे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वापरले गेले आहे. हे गाणे एका तणावपूर्ण दृश्यात आहे. हे रोमँटिक गाण्यापेक्षा अधिक सस्पेन्स गाणे आहे. यात रॅपचा टच देण्यात आला आहे. दृश्यासाठी अगदी साजेसे वाटेल असे हे गाणे वापरले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










