Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड अभिमानास्पद! ध्वनी भानुशालीने उंचावली भारताची मान, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली गायिका

अभिमानास्पद! ध्वनी भानुशालीने उंचावली भारताची मान, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर झळकली गायिका

भारताची तरुण आणि यशस्वी पॉपस्टार ध्वनी भानुशालीने (Dhvani Bhanushali) भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर तिला स्थान देण्यात आले आहे. Spotifyच्या इक्वल कॅंपेनमध्ये सातत्याने रेकॉर्डब्रेक कलाकार म्हणून तिला आर्टिस्ट ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे. या कॅंपेनमध्ये जगभरातील महिला कलाकारांचा सहभाग होता. न्यूयॉर्कचा ‘टाईम्स स्क्वेअर’ हा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक चौक आणि पर्यटकांच्या आकर्षणांपैकी एक आहे.

गायिकेच्या गाण्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिची शेवटची ‘डायनामाइट’ हे सिंगल खूप यशस्वी ठरले. याशिवाय ध्वनीने अनेक चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. ‘सत्यमेव जयते’, ‘लुका छुपी’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘मरजावां’, ‘गुड न्यूज स्ट्रीट डान्सर’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांसाठी तिने गाणी गायली आहेत. (dhvani bhanushali makes india proud she gets featured on new york times square billboard)

यूट्यूबवर बनवलंय रेकॉर्ड
ध्वनीच्या आवाजाचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. तिचे गाणे यूट्यूबवर येताच ट्रेंडिंग व्हायला लागते. तिच्या ‘वास्ते’ या गाण्याने यूट्यूबवर नवा रेकॉर्ड केला होता. या गाण्याला आतापर्यंत १४० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, ‘वास्ते’ हे यूट्यूबवर ११ कोटींहून अधिक लाईक्ससह सर्वाधिक पसंत केलेले भारतीय गाणे आहे. हे गाणे जगातील १० सर्वाधिक पसंत केलेल्या संगीत व्हिडिओंपैकी एक आहे.

लवकरच येऊ शकते चित्रपटात
प्लेबँक सिंगिंगनंतर ध्वनी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे वडील तिला त्यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे लॉन्च करू शकतात. सध्या बॉलिवूडमध्ये ती कोणत्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे? याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा