ज्या गायिकेच्या गाण्यांना यूट्यूबवर १ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेत, तिला कपडे धुताना पाहिलंय का? एकदा पाहाच

Singer Dhvani Bhanushali Washed Clothes In Funny Way Video Viral On Internet


बॉलिवूडमध्ये अनेक गायिकांनी आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांच्या मनावर राज्य केले आहे. खूप कमी काळात त्यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या गायिकांमध्ये नवोदित गायिका ध्वनी भानुशालीचाही समावेश आहे. नुकतेच तिचे ‘राधा’ गाणे रिलीझ झाले होते. हे गाणे चांगलेच चर्चेत आहे. याव्यतिरिक्त ध्वनीच्या गाण्यांवरील व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. तिच्या गाण्यांच्या व्हिडिओव्यतिरिक्त तिचे फोटोशूटही पसंत केले जातात. परंतु सध्या ध्वनीच्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा व्हिडिओ कोणताही डान्स व्हिडिओ नाही, तर कपडे धुतानाचा आहे.

ध्वनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लॉकडाऊनमध्ये कपडे धुतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, तिची लहान बहीण दिया भानुशाली म्हणते की, ‘आता कपडे घाण आहेत, मशीनमध्ये पुन्हा एकदा धुवून टाकून दे.’ दुसरीकडे तिचे वडील आणि बहीण ध्वनीला अशाप्रकारे कपडे धुताना पाहून खूप हसतात.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ध्वनी जमिनीवर आपटून कपडे धुवत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारही या व्हिडिओचा आनंद लुटत आहेत. या व्हिडिओवरील कमेंट पाहून तुम्हीही खदखदून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

विशेष म्हणजे ध्वनीचे वय केवळ २३ वर्षे आहे. परंतु इतक्या कमी वयातही तिची फॅन फॉलोविंग कमालीची आहे. तिला इंस्टाग्रामवर तब्बल ४.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. ‘ले जा रे’ आणि ‘वास्ते’ हे तिचे सर्वात गाजलेले गाणे आहेत. या गाण्यांनी भल्या भल्या गाण्यांचे विक्रम मोडले आहेत. या गाण्यांनी यूट्यूबवर १ बिलियन व्ह्यूजचा टप्पाही पार केला आहे. खरं तर ध्वनीचे वडील विनोद सर्वात मोठ्या म्युझिक कंपनी टी- सीरिजचे ग्लोबल मार्केटिंग अँड मीडिया पब्लिशिंगचे अध्यक्ष आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बंगाल हिंसेवर ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतने रडत रडत दु: ख केले व्यक्त, सरकारकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

-‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने दिले नव्हते ऑडिशन, मुलाखतीत केला खुलासा

-जेव्हा सेटवर दयाबेनला ‘ए पागल औरत’ बोलणे जेठालालला पडले होते भलतेच महाग!


Leave A Reply

Your email address will not be published.