Wednesday, June 26, 2024

‘तुमच्यासोबत काम करणे माझे स्वप्न होते’, म्हणत दियाने दिल्या नागार्जुन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

दक्षिण चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नागार्जुन. २९ ऑगस्ट १९५९ रोजी जन्मलेले सुपरस्टार अभिनेते नागार्जुन हे अभिनेता असण्याव्यतिरिक्त एक चित्रपट निर्माते आणि व्यावसायिक देखील आहे. तर साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेता अक्कीनेनी नागेश्वर राव त्यांचा मुलगा आहेत. २९ ऑगस्ट रोजी नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दक्षिण सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमधील सर्व स्टार्सने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानेही नागार्जुन यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. दियाने नागार्जुनसोबत स्वतःचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. तसेच, दियाने सांगितले की, नागार्जुनसोबत काम करणे हे तिचे स्वप्न होते जे आता पूर्ण होणार आहे.

या फोटोंमध्ये नागार्जुन आणि दिया एकत्र बसलेले दिसत आहेत. फोटो शेअर करताना दियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाग सर, राजाला येणाऱ्या चांगल्या वर्षाच्या शुभेच्छा.” आता तुम्ही म्हणाल, दियाने त्यांना राजा का म्हटले? या मागेही एक कारण आहे. ते तिने स्पष्ट केले. (dia mirza birthday wishe to superstar nagarjun)

दियाने पुढे लिहिले, “त्यांचे निर्मळ हृदय, त्यांचे निरीक्षण, समस्या सोडवण्याची त्यांची पद्धत, त्यांच्यामध्ये असलेली जिज्ञासा, त्यांच काम आणि लहान मुलासारखे जगण्याचे आणि वागण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. एक निसर्ग प्रेमी आणि एक उत्तम सह-अभिनेता. त्यांच्यासोबत काम करणे हे माझे स्वप्न होते जे आता पूर्ण होणार आहे. माझी अपेक्षा आहे की, एकत्र काम करून अजून आठवणी नक्कीच तयार होती.

अभिनेता, निर्माता असलेले नागार्जुन हे केवळ साऊथमधीलच नाही तर बॉलिवूडमधील देखील एक मोठे नाव आहे. नागार्जुन यांनी १९९२ मध्ये ‘खुदा गवाह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्यासोबत या चित्रपटात श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच साऊथ चित्रपट क्षेत्रात त्यांच नाव मोठं होत. नागार्जुन यांची चित्रपट कारकीर्द खुप मोठी आहे. त्यांचा पहिला चित्रपट १९६७ साली आला. नागार्जुन हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आलिशान लाइफसाठी देखील ओळखले जातात.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा