×

Dhaakad | ‘या’मुळे हटवली का बिग बींनी कंगनाबद्दलची पोस्ट? म्हणाले, ‘मला खूप वेळा…’

कंगना रणौत (Kangana Ranaut) अभिनित ‘धाकड’ बॉक्स ऑफिसवर रिलीझ होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी अभिनेत्री त्याचे जोरदार प्रमोशनही करत आहे. नुकतेच या चित्रपटाचे ‘शी इज ऑन फायर’ हे गाणे रिलीझ झाले, जे चाहत्यांना खूप आवडले आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही हे गाणे रिलीझ झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु काही वेळानंतर त्यांनी लगेच पोस्ट हटवली. आता बिग बींनी हे पाऊल का उचलले, याबाबत एक मोठी हिंट दिली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये लिहिले की, त्यांना सोशल मीडियावरील त्यांच्या काही पोस्टसाठी नोटिसा मिळाल्या आहेत आणि पोस्टमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यांनी लिहिले की, “मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही प्रायोजित पोस्टचा उल्लेख करणे आवश्यक आहे. कारण अन्यथा ते बेकायदेशीर मानले जाईल.” (did amitabh bachchan delete dhaakad post because of this reason)

अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “भारत सरकारचे कठोर नियम आणि कायदे आहेत आणि आता ASCI मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत.” ते पुढे म्हणाले, “नवीन नियमानुसार, आता इंफ्लूएंसरला सांगावे लागेल की, ते एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत आहेत की त्यात भागीदारीत आहेत. अन्यथा ते बेकायदेशीर मानले जाईल. त्यामुळे माझ्या अनेक पोस्ट्सवर नोटीस देण्यात आल्या आहेत, की त्या बदलण्यात याव्या.”

कंगनाने बिग बींनी पोस्ट हटवल्याबद्दल प्रतिक्रियाही दिली होती. ती म्हणाली होती की, “काही लोकांमध्ये वैयक्तिक असुरक्षितता आहे, तर काही लोकांना भीती आहे की, माझे किंवा माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्याने इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल.” विशेष म्हणजे, कंगनाचा हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर या चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. आता प्रेक्षकांना कंगनाचा ऍक्शन अवतार आवडतो की, नाही हे उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post