×

Dhaakad | बिग बींनी टीझर डिलीट केल्यामुळे भडकली कंगना; म्हणाली, ‘त्यांना बॉयकॉट…’

दहा आठवडे ‘लॉकअप’ होस्ट केल्यानंतर, कंगना रणौत (Kangana Ranaut) आता ‘एजंट अग्नी’ म्हणून तिच्या पुढच्या मिशनसाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री सध्या ऍक्शन ड्रामा फिल्म ‘धाकड’चे प्रमोशन करत आहे, जो २० मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कंगना रणौतशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल (Arjun Rampal), शाश्वत चॅटर्जी (Shashwat Chatterjee) आणि दिव्या दत्ता (Divya Dutta) यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

अलीकडेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कंगना रणौतच्या या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याचे टायटल ‘शीज ऑन फायर’ असे होते. ही क्लिप शेअर करत बच्चन यांनी टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अभिनेत्याने काही वेळातच त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून हा टीझर डिलीट केला. (dhaakad starrer kangana ranaut reacts to amitabh bachchan deleting his post)

आता कंगना रणौत या गोष्टीवर उघडपणे बोलली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, धाकडच्या ट्रेलरचे इतर बॉलिवूड स्टार्सनी कौतुक का केले नाही? तेव्हा कंगना म्हणाली, “काही लोकांमध्ये वैयक्तिक असुरक्षितता असते. काही लोकांना भीती असते की माझे किंवा माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल.”

अभिनेत्री म्हणाली, “लोकांच्या आवडीनिवडी आणि नापसंती नक्कीच असतात. पण ते इतके धक्कादायक आहे की, बच्चन साहेबांनी ट्रेलर पोस्ट केला आणि मग पाच-दहा मिनिटांनी डिलीट करून टाकला. त्यांच्यासारख्या सुपरस्टारवर कोण दबाव आणेल, मला नाही माहीत. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे.”

दरम्यान अभिनेत्रीच्या ‘धाकड’ चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post