करण जोहरने (Karan Johar) त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशराज फिल्म स्टुडिओमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. त्यानंतर एका न्यूज वेबसाईटने दावा केला की, या पार्टीत सहभागी झालेल्या जवळपास ५० पाहुण्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, रविवारी (५ जून) एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की या केवळ अफवा आहेत.
शनिवारी अनेक वेबसाइट्सनी सांगितले होते की, करणचा मुंबईतील स्टार-स्टडेड बर्थडे पार्टी हा कोव्हिड-१९ सुपर-स्प्रेडर इव्हेंट होता. ज्यामुळे थोड्याच दिवसांत हजेरी लावलेल्या अनेक पाहुण्यांचा कोव्हिड-१९चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ४ जून रोजी पार्टीनंतर काही दिवसांनी अभिनेता कार्तिक आर्यनने (kartik Aaryan) ट्विटरवर स्वत: कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. मात्र तो करणच्या पार्टीत गेला नव्हता. तो त्याच्या ‘भूल भुलैया २’ या नवीन चित्रपटाचे देशभरात प्रमोशन करत होता. (did corona virus explode at karan johar party the truth revealed)
एका सूत्राने रिपोर्टमध्ये सांगितले होते की, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील करणचे अनेक जवळचे मित्र पार्टीनंतर कोविड-संक्रमित झाले आहेत. मात्र त्यांच्यापैकी कोणीही त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे उघड केले नाही. सूत्राने असा दावा केला होता की, कार्तिक आर्यन पार्टीला उपस्थित नसतानाही त्याला कोरोनाची लागण झाली. कारण त्याच्या चित्रपटाची नायिका त्या पार्टीत सहभागी झाली होती आणि नंतर कार्तिकसोबत चित्रपटाचे प्रमोशन करत होती.
मात्र, करणच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, या सर्व केवळ अफवा आहेत. सूत्राने दावा केला की, करण सध्या ‘कॉफी विथ करण’साठी शूटिंग करत आहे. त्यामुळे त्याची सतत कोरोना चाचणी होत आहे. याशिवाय या शोमध्ये येणार्या पाहुण्यांना कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले जात आहे. सूत्राने सांगितले की, करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक स्टार्सनी आतापर्यंत जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. परंतु करणच्या पार्टीशीच कोव्हिड पॉझिटिव्ह सेलेब्सची नावे जोडली जात आहेत, जे योग्य नाही.
तसेच आतापर्यंत या पार्टीत सामील झालेल्या आदित्य रॉय कपूर, शाहरुख खान आणि कॅटरिना कैफला कोरोनाची लागण झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा