Sunday, April 14, 2024

करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये ऐश्वर्या राहिली सलमान पासून लांब, मात्र अभिषेकने मारल्या दबंग खानसोबत गप्पा

नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या करण जोहरने त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या ५० व्या वाढदिवसाची करणने एक ग्रँड पार्टी दिली, या पार्टीला संपूर्ण बॉलिवूड, टेलिव्हिजनविश्वातील मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. एकता कपूर, आमिर खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय आदी अनेक कलाकार या पार्टीत दिसले. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या पार्टीच्या निमित्ताने एकमेकांशी न बोलणारे कलाकार समोरासमोर आलेले दिसले. यातच अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा देखील आमना सामना झाला.

या पार्टीमध्ये सर्वांच्याच नजरा सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंड असलेल्या कॅटरिना कैफ आणि ऐश्वर्या राय यांच्यावर खिळल्या होत्या. कॅटरिना आणि ऐश्वर्या दोघीही त्यांच्या नवऱ्यांसोबतच अभिषेक बच्चन आणि विकी कौशलसोबत पोहचल्या होत्या. मात्र या पार्टीमध्ये सलमान आणि ऐश्वर्या नाही तर सलमान आणि अभिषेक बच्चन यांची भेट झाली. प्राप्त माहितीनुसार दोघांनीही बराच वेळ गप्पा देखील मारल्या. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी रात्री १२.३० वाजता या पार्टीमध्ये एन्ट्री केली, तर सलमान खानने १.१५ वाजता एन्ट्री केली. पार्टीमध्ये सलमान खानला डान्स फ्लोरवर पाहून अभिषेक बच्चन लगेच त्याला भेटायला गेला. अभिषेक आणि सलमान खान एकमेकांशी चर्चा करत असताना ऐश्वर्या मात्र त्यांच्यापासून लांब होती.

ऐश्वर्या राय नेहमीच सलमान खानबद्दल बोलताना किंवा त्याच्याशी आमना सामना होताना नेहमीच कचरताना दिसते. मात्र जेव्हा जेव्हा सलमान खानसमोर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख आला तर तो नेहमीच त्यांच्याबद्दल आदराने बोलताना दिसतो. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकमेकांना जवळपास ३ वर्ष डेट केले. त्यानंतर २००२ साली ब्रेकअप झाले. या पार्टीमध्ये सलमान खानच्या एक्स वहिन्या देखील दिसल्या सीमा सचदेव, मलायका अरोरा यासोबतच त्याच्या बहिणी अर्पिता खान, अलवीरा अग्निहोत्री देखील स्पॉट झाल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा