Friday, December 5, 2025
Home अन्य बाबांच्या कडेवर बसलेली चिमुकली ओळखली का? आज आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री

बाबांच्या कडेवर बसलेली चिमुकली ओळखली का? आज आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री

सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होताना आपण पाहतो. यात काहींचे बोल्ड, तर काहींचे गोंडस फोटो व्हायरल होतात. तसेच, सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोचा ट्रेंडही बऱ्याचदा पाहायला मिळतो. काहीवेळा स्वतः कलाकार मंडळी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर गोड फोटो शेअर करत असतात.

अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटोही इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीमध्ये नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो! (did you recognize this cute girl today is the famous actress in the marathi art world)

व्हायरल फोटोमध्ये वडिलांच्या कडेवर बसलेली ही चिमुकली अपूर्वा गोरे (Apurva Gore) आहे. होय, तीच अपूर्वा जी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीच्या मुलीची भूमिका साकारत आहे. फोटोतील तिचं गोड-गोंडस रूप बघून, तुम्हीही हरपला असाल! हा फोटो तिच्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे.

दुसरीकडे अपूर्वा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. यावर ती तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करते, ज्याला तिचे चाहतेही भरभरून प्रेम देतात. तिचे डान्स व्हिडिओ तर चाहत्यांसाठी खास आकर्षण! अनेकदा आपल्या डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वाढणाऱ्या अपूर्वाचे सोशल मीडियावर हजारो फॉलोव्हर्स आहेत. जे तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

अपूर्वाने केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी मालिकेतही काम केलं आहे. ती ‘वागळे की दुनिया’ या मालिकेत काम केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा