कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची लाडकी बहिण आदिमाया संतशिरोमणी ‘मुक्ताई’ यांच्या जीवनकार्यावरील ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर लिखित – दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सुमारे ८४ वर्षांनंतर या विषयावर चित्रनिर्मिती होत आहे. आत्ताच्या काळात अशा प्रकारच्या विषयावर चित्रकलाकृती निर्माण करणं अवघड काम आहे. परंतु आमच्या आधीच्या सर्व चित्रपटांच्या मागे तुम्ही केवळ माध्यम प्रतिनिधी म्हणून नाही, तर आमच्या कुटुंब सदस्यांप्रमाणे उभे राहिलात, आणि वेळोवेळी अशी धाडसं करायला आम्हाला बळ दिलेत. आताही या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीच्या अनुषंगाने एक दिव्य सोहळा आयोजित करण्याचे आम्ही योजिले असून या सोहळ्यास तुमच्या उपस्थितीने शोभा येणार आहे.
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या महान भावंडांच्या भूमिका कोण करणार? याकडे महाराष्ट्र कुतूहलाने पाहत आहे. त्याचे उत्तर आपण सगळे मिळून आता उभ्या महाराष्ट्राला देणार आहोत. आपण सगळे ज्ञानेश्वर माउली, संत मुक्ताई यांना प्रत्यक्ष आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सगुण साकार होताना अनुभवणार आहोत.
दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या सहाय्याने या आधी आपल्या श्री शिवराज अष्टकातून महाराष्ट्राच्या वीरांची भक्ती, शक्ती आणि युक्तीची महती आपल्या भावी पिढी मध्ये रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आता ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाद्वारे रसिकांना आपल्या संतांच्या अलौकिक कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
चिरंजीवीला मिळाले ब्रिटनचे नागरीकत्व; अभिनेता सोडणार भारत ?…
धनुषची इडली कढाई परत रखडली; आता ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट…