कोरोना काळानंतर जशी चित्रपटगृहे चालू झाली आहेत तेव्हापासून अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. मराठीतील देखील एका मागून एक चित्रपटांचा धूमधडाका चालू आहे. अशातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘दिल दिमाग और बत्ती’. या चित्रपटात आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. चित्रपटात २० तगडे कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपट काहीतरी भन्नाट असणार आहे याची जाणीव होते. चित्रपटाचा ट्रेलर आणि टिझर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे.
नुकतेच प्रदर्शित झालेल्या गाण्याचे बोल ‘घोडा लावीन तुला’ हे आहे. गाण्याचे शब्द ऐकवून सगळ्यांना असा प्रश्न पडला आहे की, गाण्याचे बोल असे ठेवले आहे. याबाबत या गाण्याचे गायक अवधूत गुप्ते याने या गाण्याचा पोस्टर शेअर करून एक कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “प्रत्येक गाण्याचं श्रेय हे काही दरवेळेस संगीतकार किंवा कवी ह्यांच्याच कडे जातं असं नाही. आता ह्याच गाण्याचं बघा ना! खरं श्रेय दिग्दर्शकाचं ज्याने सेंसोर बोर्ड मधून हे गाणं पास करून आणलं. आता ते सेन्सॉरनी का पास केलं? ह्या शब्दांचा कथेनुसार नक्की अर्थ काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल. तोपर्यंत गाणं एन्जॉय करा.”
हे गाणे अभिनेत्री संस्कृती बालगुडे दिसत आहे. तिचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिसत आहे. चित्रपटात दिलीप प्रभाळकर, सागर संत, संस्कृती बालगुडे, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे असे कलाकार दिसत आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट देखील तसाच भन्नाट असेल यात काही वाद नाही. हा चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-