×

काय सांगता! भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग घेणार दुसऱ्या बायकोपासून घटस्फोट?

भोजपुरी सिनेमा मधल्या काही काळापासून मोठ्याप्रमाणावर चर्चेत आला आहे. भोजपुरी भाषेतील गाणी आणि कलाकार सध्या पॅन इंडिया पातळीवर गाजताना दिसत आहे. या कलाकारांना मिळणारी ओळख आणि प्रसिद्धी सुखद आहे. अशाच या भोजपुरी इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार अभिनेता आणि गायक पवन सिंग लवकरच त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून वेगळा होणार आहे.

टॉपचा भोजपुरी अभिनेता आणि गायक असणारा पवन सिंग लवकरच त्याची दुसरी पत्नी असलेल्या ज्योती सिंगला घटस्फोट देणार असून, त्याने आरा फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे. तर दुसरीकडे ज्योती सिंगने तिच्या नवऱ्यावर पवन सिंगवर प्रताडित करण्याचा आरोप लावला आहे. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर ज्योती सिंग कोर्टात आली होती, मात्र पवन सिंग आला नव्हता. त्यामुळे कोर्टाने पवन आणि ज्योती या दोघांनाही २६ मेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vishal singh (@vishalsingh873)

तत्पूर्वी पवन सिंगने २०१८ साली ज्योती नावाच्या मुलीसोबत दुसरे लग्न केले होते. तर त्याची पहिली पत्नी असलेल्या नीलमने लग्नानंतर सहा वर्षांनी आत्महत्या केली होती. याच दरम्यान पवन सिंगचे नाव भोजपुरी अभिनेत्री गायिका अक्षरा सिंगसोबत देखील जोडले गेले होते. अक्षराने पवन सिंगवर अनेक गंभीर आरोप केले होते. अक्षरा आणि पवनमधला वाद मीडियामध्ये तुफान गाजला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पवन सिंग नेहमीच त्याची दुसरी पत्नी असलेल्या ज्योती सिंगला मीडियासमोर आणण्यासाठी जरा काचकूच करतो. पवनने कधीच सोशल मीडियावर त्याचे पत्नीसोबतचे फोटो देखील शेअर केले नाही किंवा तो ज्योतीला कोणत्याही पार्टीला देखील घेऊन जात नाही. आता या घटस्फोटाचे खरे कारण तर समोर आले नाही. मात्र पुन्हा एकदा पवन सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post