Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन ‘तारक मेहता ..’ मधून आणखी एका कलाकाराची एक्सीट ! कलाकार झाले भावुक

‘तारक मेहता ..’ मधून आणखी एका कलाकाराची एक्सीट ! कलाकार झाले भावुक

तारक मेहता का उल्टा चष्मा हा कार्यक्रम देशातील सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये गणला जातो. या शोच्या प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. मात्र मागील काही वर्षांत अनेक स्टार्सनी हा शो सोडला आहे. आता या यादीत कुश शाहच्या नावाचाही समावेश झाला आहे.

अलीकडेच, तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यामध्ये कुश या बातमीची खात्री करताना दिसत होता. त्या व्हिडिओमध्ये कुश म्हणत होता, “जेव्हा हा शो सुरू झाला आणि तुम्ही आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी खूप लहान होतो. तेव्हापासून तुम्ही मला खूप प्रेम दिले आहे आणि या कुटुंबाने मला तितकेच प्रेम दिले आहे. मी इथे खूप आठवणी निर्माण केल्या आहेत.

त्याचवेळी या शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी कुश शाह या शोमधून बाहेर पडल्यावर एका इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने शोची जुन्या एपीसोडची एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तो कुशसोबत दिसत आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी तुझ्यासोबत केलेल्या प्रत्येक सीनचा आनंद लुटला आहे. तुला शुभेच्छा! हसत राहा… आता तुला बंदुकीच्या गोळीप्रमाणे पुढे जाताना पाहण्याची वाट बघतो आहे.”

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो गेल्या १६ वर्षांपासून टेलिव्हिजनवर सुरू आहे. हा शो सोडणारा कुश काही पहिला अभिनेता नाही. यापूर्वी दिशा वकानी, भव्य गांधी, गुरुचरण सिंग, शैलेश लोढा, नेहा मेहता, जेनिफर मिस्त्री आणि राज अनाडकट यांच्यासह अनेक कलाकारांनीही वेगवेगळ्या कारणास्तव शो ला रामराम ठोकला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शाहरुख खानने त्याच्या फिटनेसचे श्रेय देतो मुलगा आर्यनला; शेअर केली मोठी गोष्ट
ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका-अर्जुन विमानतळावर झाले स्पॉट; लोकांनी विचारले, ‘पॅचअप झाले आहे का?’

हे देखील वाचा