असे म्हटले जाते की, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी अशी भूमिका येते जी त्या कलाकाराच्या संपूर्ण करिअरला आणि पर्यायाने संपूर्ण नशिबालाच बदलून टाकते. कलाकार नेहमीच त्यांच्या सुरुवातीच्या काळात यश मिळवण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करतात. अनेक लहान मोठ्या, सर्वच भूमिका अतिशय बखुबीने निभावतात. आज जेठालाल गडा हे नाव माहित नसणारा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील जेठालाल गडा म्हणजेच दिलीप जोशी आज संपूर्ण जगात त्यांच्या भूमिकेमुळे ओळखले जातात. मात्र इतर कलाकारांप्रमाणे दिलीप जोशी यांनी मेहनत आणि चिकाटीने एवढे मोठे यश संपादन केले. बऱ्याच लोकांना माहित नसेल की, त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक मोठ्या कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या होत्या. तेव्हा ते आजच्या इतके प्रसिद्ध नसल्याने कोणी त्यांच्याकडे लक्षपण दिले नसेल. आज आम्ही तुम्हाला दिलीप जोशी यांच्या अशाच काही बॉलिवूड चित्रपटांमधील भूमिकांविषयी सांगणार आहोत.
हम आपके हैं कौन :
माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटात दिलीप जोशी यांनी भोला प्रसाद ही भूमिका साकारली होती. छोटी असणारी त्यांची भूमिका आज सर्वच जणं अगदी आनंदाने आणि लक्षदेत बघताना दिसतात.
मैने प्यार किया :
सलमान खान आणि भाग्यश्री यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटात दिलीप जोशी यांनी सलमान खानच्या घरातील नोकराची भूमिका साकारली होती.
वन टू का फोर :
२००१ साली आलेला हा सिनेमा सर्वांना माहीतच असेल. या चित्रपटात शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि जुही चावला यांच्या भूमिका होत्या. त्यात दिलीप जोशी यांनी, लहान मुलांच्या केयर टेकरची भूमिका निभावली होती.
दिल हैं तुम्हारा :
या चित्रपटात अर्जुन रामपाल, प्रीती झिंटा आणि महिमा चौधरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. दिलीप यांनी या सिनेमात अर्जुन रामपालच्या कंपनीच्या सीईओची भूमिका साकारली होती.
ढूंढते रह जाओगे :
या सिनेमात दिलीप यांनी एका नाटक कंपनीच्या मुख्य माणसाची भूमिका साकारली होती. त्यांचा चित्रपटातील लूक देखील हटके होता.
हमराज :
२००२ साली आलेल्या या चित्रपटात दिलीप जोशी यांनी बॉबी देओलच्या ऑफिसमधील विनोदी अशा शिपायाची भूमिका केली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम