सिनेसृष्टीतून नुकतीच एक बातमी समोर आली आहे, ज्याने दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा चिंतेत पाडलं आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना पुन्हा एकदा श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयाशी संबंधित एका स्त्रोताने एका न्यूज चॅनलला सांगितले की, सध्या दिलीप कुमार यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
अचानक तब्येत बिघडल्याने दिलीपकुमार यांना मंगळवारी (२९ जून) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या एका सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, दिलीपकुमार यांची तब्येत आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. तसेच चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
https://twitter.com/TheDilipKumar/status/1401889531847135233?s=20
या व्यतिरिक्त एका कौटुंबिक स्रोताने एका न्यूज चॅनलला सांगितले की, दिलीपकुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यांचे वय पाहता अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल करावे लागले. पण काळजी करण्याची काहीच गरज नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. (dilip kumar health update veteran actor admitted to hinduja hospital due to breathing issues)
दिलीपकुमार यांना श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे ६ जून रोजी त्याच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर डिस्चार्ज होण्याच्या एक दिवस आधी, दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात जमा झालेले पाणी किरकोळ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले होते. ५ दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर, दिलीप कुमार यांना ११ जूनला रुग्णालयातून सोडण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक
-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू