Friday, August 8, 2025
Home टेलिव्हिजन Bigg Boss Malayalam | दिलिशा प्रसन्न बनली शोच्या सीझन ४ची विजेती, पहिल्यांदाच एका महिलेने जिंकली ट्रॉफी

Bigg Boss Malayalam | दिलिशा प्रसन्न बनली शोच्या सीझन ४ची विजेती, पहिल्यांदाच एका महिलेने जिंकली ट्रॉफी

अभिनेत्री-नर्तिका दिलशा प्रसन्ननने (Dilsha Prasannan) ‘बिग बॉस मल्याळम’चे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी (३ जुलै) झालेल्या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये तिला विजेता घोषित करण्यात आले. शोचे होस्ट आणि सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांनी फिनालेमध्ये दिशाला ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले. अंतिम सहा स्पर्धकांमध्ये सर्वाधिक मते मिळवून सीझनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी दिलिशा ही पहिली स्पर्धक होती. इतर पाच स्पर्धक रियास सलीम, ब्लेसले, लक्ष्मी प्रिया, सूरज थेलक्कड आणि धन्या मेरी वर्गीस होते. यासोबतच दिलिशा ‘बिग बॉस मल्याळम’ जिंकणारी पहिली महिला विजेती ठरली आहे.

फिनालेदरम्यान, तिला पाठिंबा दिल्याबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले. ती म्हणाली, “या शोमध्ये मी १०० दिवस तरी टिकेन का, असा प्रश्न मला पडला होता. या शोमध्ये मला काय करायचं आहे , हे कितीतरी दिवस समजू शकले नाही. यानंतर मी जशी आहे तसेच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मला खूप पाठिंबाही मिळाला.” (dilsha prasannan won bigg boss malayalam 4)

निर्मात्यांवर ठोठावण्यात आला होता दंड
कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ‘बिग बॉस मल्याळम’चे शेवटचे दोन सीझन फिनालेपूर्वी रद्द करण्यात आले होते. दुसरा सीझन जानेवारी २०२० मध्ये प्रीमियर झाला पण त्या वर्षीच्या मार्चमध्ये साथीच्या रोगामुळे तो रद्द करण्यात आला. कोणत्याही स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात आले नाही. यानंतर, मागील सीझन, जो फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रसारित होणार होता. तो देखील महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान रद्द करण्यात आला. तसेच शोच्या निर्मात्यांकडून दंड आकारण्यात आला. नंतर ऑगस्‍टमध्‍ये, प्रेक्षकांच्‍या मतांच्‍या आधारे मणिकट्टनला विजेता घोषित करण्‍यात आले. २० स्पर्धकांसह चौथा सीझन २७ मार्च रोजी ‘न्यू नॉर्मल’ या टॅगलाइनसह लाँच करण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा