Sunday, June 16, 2024

‘आरआरआर चित्रपट म्हणजे गे लवस्टोरी…’ ऑस्कर विजेत्या कलाकाराने केले धक्कादायक वक्तव्य, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR) यांचा आरआरआर चित्रपट प्रचंड गाजला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीपासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केलेले पाहायला मिळाले होते. एकीकडे या चित्रपटाने जगभरात वाहवा मिळवली असताना ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टी याने चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरूवात झाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टी सध्या चर्चेत आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटावर त्यांनी ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार  टीका होत आहे. नुकतेच एका ट्विटद्वारे रेसुलने या चित्रपटाचे वर्णन गे लव्हस्टोरी असे केले होते. यासोबतच त्याने चित्रपटाची अभिनेत्री आलिया भट्टलाही प्रॉप म्हणून सांगितले. चित्रपटाबद्दल केलेल्या या कमेंट लोकांना आवडल्या नाहीत आणि त्यांना प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले आहे.

अभिनेता-लेखक मुनीष भारद्वाज यांनी रविवारी एका ट्विटमध्ये ‘आरआरआर ‘कचरा’ म्हटले होते.  ‘काल रात्री RRR नावाचा 30 मिनिटांचा कचरा पाहिला.’ अशी प्रतिक्रिया त्यांंनी दिली होती.  याला ऑस्कर विजेत्या साऊंड डिझायनरने उत्तर दिले आणि ‘गे लव्ह स्टोरी’ आहे असे लिहले आहे. या उत्तरावर नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहता रेसुलनेही या ट्विटवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. आरआरआर वरील टिकेसाठी रेसुल पुकुट्टी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर आता त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले की, पाश्चात्य देशांतील लोक या चित्रपटाबाबत असे म्हणतात, मी ते उद्धृत केले आहे. नेटफ्लिक्सवर आरआरआर रिलीज झाल्यानंतर लगेचच पाश्चात्य प्रेक्षकांनी आरआरआर ला गे रोमान्स म्हटले. या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील केमिस्ट्री त्यांना आवडल्याचेही  सांगितले होते.

विशेष म्हणजे, ‘आरआरआर ‘ हा एसएस राजामौली दिग्दर्शित आणि विजयेंद्र प्रसाद लिखित एक्शन ड्रामा आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय आलिया भट्ट, अजय देवगण, श्रेया सरन यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत या चित्रपटाने जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

हे देखील वाचा