Monday, July 1, 2024

अभिनय क्षेत्रात आपल्या नावाचा डंका वाजवून विशीच्या आतच लग्न करणाऱ्या बॉलीवूड सिनेतारका

आजकाल मुलींसमोर लग्न हा विषय काढला की मुली सर्वात आधी करियरला प्राधान्य देतात त्यानंतर लग्नाला. बॉलीवूडमध्ये तर अभिनेत्रींचे लग्न झाले की त्यांची ब्रँड व्हॅल्यू कमी होते असा समज (गैर) असल्याने या क्षेत्रात अभिनेत्री लवकर लग्न करणे टाळतात. मात्र पूर्वीच्या काळी ७०/८० च्या दशकात अभिनेत्री खूप लवकर लग्न करायच्या. तर दुसऱ्या बाजूला काही अभिनेत्री त्यांचे लग्न झाल्यावर इंडस्ट्रीमध्ये आल्या. लग्नानंतर करियरला ब्रेक लागतो असा विचार त्यावेळी कधीच नव्हता. अभिनेत्री त्यांच्या लग्नानंतर देखील तितक्याच लोकप्रिय आणि प्रसिद्ध असायच्या. पण म्हणतात ना ‘बदल ही काळाची गरज असते.’ कदाचित तसेच झाल्याने बॉलीवूडमध्ये देखील अनेक बदल झाले, नवीन विचार रुजू लागले. आज आपण जुन्या अशा काही अभिनेत्री बघणार आहोत ज्यांनी अगदी कमी वयात लग्न केले होते.

डिंपल कपाडिया :
डिंपल यांनी १९७३ साली ‘बॉबी’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. मात्र तुम्हाला वाचून नवल वाटेल डिंपल यांचा हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीच त्यांनी त्यावेळीच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न करून सर्वाना सुखद धक्का दिला होता. डिंपल यांचे लग्न झाले तेव्हा त्या फक्त १६ वर्षाच्या होत्या. एका कार्यक्रमावेळी त्यांची आणि राजेश खन्ना यांची भेट झाली आणि राजेश खन्ना त्यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही महिन्यांनी या दोघांनी लग्न केले. राजेश आणि डिंपल या दोघांमध्ये १५ वर्षांचे अंतर होते. (आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी ऋषी कपूर यांनी दिलेली अंगठी डिंपल कपाडियांनी फेकली होती समुद्रात)

दिव्या भारती:
दिव्याने खूप कमी वयात खूप जास्त लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. तिने वयाच्या १८ वर्षी प्रोड्युसर साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केले. या दोघांची भेट ‘शोला आणि शबनम’ चित्रपटादरम्यान गोविंदामुळे झाली. १० मे १९९२ मध्ये त्यांनी एका खाजगी कार्यक्रमात लग्न केले. मात्र तिने तिच्या करियरसाठी तिचे लग्न लपवून ठेवले होते. पण दुर्दैवाने या लग्नाच्या एक वर्षाच्या आतच ५ एप्रिल १९९३ ला बिल्डिंगवरून पडून दिव्याचा मृत्यू झाला. आज दखल तिच्या मृत्यूबद्दल अनेक लोकांना शंका आहे. (शाहरूखसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘या’ ५ अभिनेत्रींनी घेतलाय जगाचा निरोप, एकीच्या मृत्यूचं आजंही कोडं)

भाग्यश्री :
१९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून भाग्यश्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या पुढच्याचवर्षी प्रसिद्ध उद्योगपती हिमालय दासानी सोबत तिने लग्न केले. ही दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. ज्यावेळी भाग्यश्रीचे लग्न झाले तेव्हा ती फक्त १९ वर्षाची होती. लग्नानंतर तिने चित्रपटांमधून काढता पाय घेतला. (‘तो’ कोपऱ्यात सलमानला सांगत होता, ‘जेव्हा मी कॅमेरा सेट करेन, तेव्हा तू तिला पकडून किस कर.’)

उर्वशी ढोलकिया :
कसोटी जिंदगी की मालिकेतून कोमोलिका ही नकारात्मक भूमिका साकारत उर्वशीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिने सुद्धा वयाच्या १६ व्या वर्षी प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या पुढच्याच वर्षी ती दोन जुळ्या मिलची आई देखील झाली. मात्र तिचा देखील लगेच घटस्फोट झाला.

नितु कपूर :
ऋषी कपूर, नितु कपूर हे हिंदी सिनेसृष्टीचे लोकप्रिय आणि एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांनी २२ जानेवारी १९८० मध्ये लग्न केले. त्याआधी ते अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. ज्यावेळी नितु यांचे लग्न झाले तेव्हा त्या फक्त २२ वर्षाच्या होत्या. या दोघांनी अनेक हिट सिनेमे बॉलीवूडला दिले. (बॉबी नव्हे तर ‘हा’ होता ऋषी कपूर यांचा पहिला सिनेमा! आज असते तर करियरची पन्नाशी पूर्ण झाली असती…)

सोनम :
ओए ओए गाण्यात दिसलेली अभिनेत्री सोनम यांनी त्रिदेव आणि विश्वात्मा चित्रपटांचे दिग्दर्शक राजीव राय यांच्यासोबत १९९१ मध्ये लग्न केले त्यावेळी सोनम १९ वर्षाच्या होत्या. त्यावेळी सोनम खूप लोकप्रिय अभिनेत्री होत्या. मात्र पुढे लग्नाच्या १५ वर्षांनी सोनम यांनी घटस्फोट घेत उद्योगपती मुरली पौडवाल यांच्यासोबत २०१७ साली लग्न केले.

 

 

हे देखील वाचा