Monday, July 1, 2024

घटस्फोटापासून ते धर्म बदलण्यापर्यंत विविध कारणांवरून दीपिका कक्करला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल करणे हे काही आजचे नाही. रोजच या ना कलाकारांना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगपासून मोठमोठे कलाकार देखील वाचू शकले नाही. आता टेलिव्हिजन अभिनेत्री असलेली दीपिका कक्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेक मालिकांमधून लोकप्रिय झालेली दीपिका तिच्या सोशल मीडियावरील तिच्या चॅनेलमुळे आणि त्यावरील व्हिडिओजमुळे सतत फॅन्सच्या संपर्कात असते. मात्र आता तिच्या नवीन पोस्टमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

झाले असे की, दीपिका तिच्या नवऱ्यासोबत अभिनेता शोएब इब्राहीमसोबत अजमेर शरीफ दर्ग्यावर दुआ मागण्यासाठी गेली होती. शोएबने त्यांच्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. या फोटोंमध्ये तिने स्वतःला पूर्णपणे कव्हर केले आहे. हे पाहून नेटकरी पूर्णपणे भडकले. एकाने विचारले ‘तू शोएबला घेऊन मंदिरात गेली आहेस का? स्वतःने तर पूर्णपणे धर्म बदलून टाकला.” हे पहिल्यांदा नाही याआधी देखील दीपिकाला ट्रोल केले गेले आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी दीपिका कक्कर विवाहित होती. तिचे पाहिले लग्न रौनक मेहता नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. रौनक एक पायलट होता. तेव्हा दीपिका एयरहोस्टेस होती. मात्र नंतर त्यांचे लग्न तुटले. तेव्हा तिच्या नवऱ्याने सांगितले की, शोएबमुळेच त्यांचे लग्न तुटले. ‘ससुराल सिमर का’ शोमध्ये शोएब आणि दीपिकाने सोबत काम केले. यादरम्यानच दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी २०१८ साली लग्न केले. मात्र या लग्नामुळे दीपिका खूपच वादांमध्ये अडकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

शोएबसोबत लग्न करण्यासाठी दीपिकाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला. तेव्हा तिने ‘फैजा’ नाव ठेवले आणि शोएबसोबत निकाह केला. हिंदू धर्मंसोडून मुस्लिम धर्म स्वीकारल्यामुळे तिला मोठ्या वादाला आणि ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. नुकतेच तिला शोभेच्या बहिणीच्या लग्नानंतर देखील विविध कारणांवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा