Monday, July 1, 2024

पत्नी दीपिका आणि आई-वडिलांच्या नात्याने शोएब इब्राहिम खूश, म्हणाला, ‘प्रत्येक मुलाला हेच हवे असते’

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, जी परफेक्ट कपल गोल देतात. या यादीत अभिनेत्री दीपिका कक्कर (deepika kakkar)आणि शोएब इब्राहिमचाही समावेश आहे. दीपिका कक्करने २०१८ साली ‘ससुराल सिमर का’ सह-कलाकार शोएब इब्राहिमसोबत लग्न केले आणि तेव्हापासून ते दोघेही आपल्या केमिस्ट्रीने लोकांना प्रेरणा देत आहेत.

अलीकडेच या जोडप्याने बोलताना त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. शोएब इब्राहिमने पत्नी दीपिकाचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आपल्या पत्नीच्या कुटुंबासोबतच्या चांगल्या संबंधांबद्दल ते म्हणाले, “दीपिकाचे माझ्या कुटुंबाशी खूप गोड नाते आहे, नाते काहीही असो, प्रत्येक मुलासाठी ती सर्वात चांगली भावना असते. आपल्या पत्नीचे आणि कुटुंबाचे एकमेकांशी चांगले संबंध असावेत अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते. काहीवेळा गोष्टी व्यवस्थित होत नाहीत, पण तरीही त्यांच्यात अहंकार नसतो आणि म्हणूनच मी नेहमी आनंदी असतो.”

त्याचबरोबर दीपिकाने हे देखील सांगितले आहे की, वेगवेगळ्या समुदायातील असूनही त्यांच्यातील संबंध कसे चांगले आहेत. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या सासऱ्यांसोबतचे नाते शोएबमुळे आहे. तो नेहमी आपल्यामध्ये सेतू म्हणून काम करतो. मी वेगळ्या पार्श्वभूमीची आहे आणि अम्मी आणि सबा (नणंद) वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आहेत पण त्यांनी नेहमीच त्यांची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे आम्हाला आनंद होतो.”

अनेकदा पत्नीचे यश पतीला सहन होत नाही, पण शोएब आणि दीपिका यांच्यात असे घडत नाही. शोएब दीपिकासारखा यशस्वी नसला तरी पत्नीच्या यशाचा त्याला अभिमान आहे. यावर शोएब म्हणाला, “दीपिकाचा नवरा म्हणून संबोधल्याचा मला अभिमान वाटतो. ती खूप मजबूत आहे, नेहमी प्रेरित आहे आणि खरोखर संपूर्ण घराची काळजी घेते. मला खूप अभिमान आहे की ती माझी पत्नी आहे.” अशाप्रकारे त्यांनी त्यांचा वैवाहिक जीवनाचाही अनिभव शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्यात असणाराने बॉण्डिंग देखील शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 हेही वाचा-

हे देखील वाचा