Tuesday, July 9, 2024

प्रेग्नन्सीच्या काळात नैराश्याशी झगडत आहे अभिनेत्री दीपिका कक्कड, बाळाबद्दल ‘ही’ सतावते भीती

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्कड. मालिकेच्या माध्यमातून ती सध्या दिसत नसली तरी ती तिच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमधून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे व्हिडिओ हे चांगलेच प्रसिद्ध असून ते व्हायरल देखील होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून ती सतत तिच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सर्वांना माहिती देत असते. सर्वांना माहीतच आहे की, लवकरच दीपिका आई होणार असून, सध्या ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र या काळात तिला अनेक आव्हानांना देखील सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येक स्त्रीसाठी प्रेग्नन्सीचा काळ हा खूपच आनंदाचा आणि तेवढाच कृशल देखील असतो. कारण स्त्रीच्या शरीरात या दरम्यान खूप मोठे बदल घड असतात. त्यामुळे हे दिवस कधी आनंदी तर कधी त्रासदायक ठरतात. नुकताच दीपिकाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने तिच्या या प्रेगन्सीच्या काळात तिला येणाऱ्या विविध अनुभवांसोबतच मूड स्विंग्स आणि अपराधी वाटत असल्याचे सांगितले आहे. ती म्हणाली की ती अपराधीपणाच्या भावनेत गेली होती, ज्यामुळे तिला तिच्या बाळाबद्दल एक भीती सतावत होती.

दीपिका म्हणाली की तिने तब्येतीच्या कारणामुळे अनेक दिवस व्हिडिओ केला नाही. पुढे ती म्हणाली, “मी खूपच जास्त लो फील करत होती. मी जास्त इरिटेट होती. मला वाटत होती की मी डिप्रेशनमध्ये आहे. जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता तेव्हा असे वाटणे किंवा अपराधी वाटणे सामान्य असते. मी विचार करत होती, असे का होत आहे, असे नको व्हायला मला. मी माझ्या बाळासाठी योग्य नाही करत आहे.”

पुढे दीपिका म्हणाली, “मी खूप जास्त विचार करत होती की मला खुश राहायचे. बाळासाठी हे योग्य नाही. मग लोकांनी मला कमेंट्स करून सांगितले की स्वतःला एवढा ताण देऊ नको. असे होत असते. तणावापासून दूर राहा. मी नैराश्याला दूर ठेवण्यासाठी जंक फूड खूप जास्त झाले. तत्पूर्वी दीपिका आणि तिचा नवरा शोएब यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दीपिका प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा