Monday, July 1, 2024

दिग्दर्शक भाऊरावच्या नजरेने कैद केले दोन नवे चेहरे, ‘टीडीएम’मध्ये दिसणार त्यांच्या अभिनयाची कमाल

‘टीडीएम’ चित्रपटाच्या पोस्टरने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली होती. कारण, चित्रपटात कोणता कलाकार भूमिका साकारणार हे गुपित ठेवण्यात आले होते. मात्र, आता या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी त्यांच्या नजरेने कैद केलेले दोन नवोदित चेहरे चित्रपटात अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाले आहेत. चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालींदी ही नवोदित जोडगोळी प्रेक्षकांच्या मनावर ताबा घ्यायला तयार झाली आहे. यासह चित्रपटातील गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केले आहे. सोशल मिडीयावर वाऱ्यासारख पसरलेल हे ‘एक फुल’ गाणं ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत प्रदर्शित हाेणार आहे.

वास्तविकतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाला रोमान्सची जोड आहे हे गाण्यांवरून स्पष्ट होतंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर ‘टीडीएम’ चित्रपटातून नव्यानं प्रेक्षकांच्या समोर एक आगळावेगळा विषय घेऊन येत आहेत. ‘टीडीएम’ मध्ये पृथ्वीराज आणि कालींदीचा रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मितीचीही धुरा भाऊरावांनी पेलवली आहे. ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत, तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित ‘टीडीएम’ हा दमदार चित्रपट 28 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. तर चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांच्या सुमधुर आवाजात सुरबद्ध केले आहे. 28 एप्रिल 2023 ला हा सिनेमा मोठया पडद्यावर प्रदर्शित होत आहे.(Director Bhaurao captured two new faces; The peak of his acting will be seen in the movie ‘TDM’)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राम चरणच्या पत्नीने सिद्धार्थ मल्होत्रा अन् कियारा अडवाणीची मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

रोमन वास्तुकलेवरून प्रेरित कियाराच्या लग्नाच्या लेहेंग्याने वेधले लक्ष, सिद्धार्थचा लूक देखील ठरला आकर्षक

हे देखील वाचा