Tuesday, June 25, 2024

राम चरणच्या पत्नीने सिद्धार्थ मल्होत्रा अन् कियारा अडवाणीची मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचा बोलबाला आहे. या जोडप्याने 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरमध्ये धूमधडाक्यात लग्न केले, ज्यामध्ये करण जोहर ते शाहिद कपूर, मीरा राजपूत, मनीष मल्होत्रा, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते.

अशात काल रात्री म्हणजेच मंगळवारी (दि. 7 फेब्रुवारी)ला या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यावर सेलेब्सच्या अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. या जोडप्याच्या पोस्टवर, आलिया भट्ट ते कॅटरिना कॅफसह सर्वजण विवाह बंधनात अडकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत हाेते, परंतु एक सेलिब्रिटी देखील आहे ज्याने कियारा आणि सिडची जाहीर माफी मागितली आहे.

तर झाले असे की, RRR फेम अभिनेता राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी, कियाराला तिच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आणि तिच्या जोडीदाराची माफीही मागितली. तिने कमेंटमध्ये लिहिले, ‘अभिनंदन.. खूप सुंदर आहे. माफ करा आम्ही तिथे येऊ शकलो नाही. तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम.’

उपासनाच्या या कमेंटवरून हे स्पष्ट झाले आहे की, कियारा अडवाणीने राम चरण आणि उपासना कामिनेनी यांना तिच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले होते. मात्र, काही कारणास्तव हे जोडपे या नव्या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. अशा स्थितीत उपासनाने या नव्या जाेडप्याची माफी मागितली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

कियारा लवकरच राम चरण सोबत एस. शंकरच्या अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शेड्यूल गेल्या वर्षी नाेव्हेंबरमध्ये न्यूझीलंडमध्ये पुर्ण करण्यात आले, ज्याचे फाेटाे त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हा त्यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी, दोघांनी बोयापती श्रीनूच्या विनया विधेय रामामध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली होती.(ram charan wife upasana kamineni apologized to actor siddharth malhotra and actress kiara advani )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाना पाटेकर यांनी आतंकवाद्यची भूमिका आहे म्हणून बॉडी ऑफ लाइज हॉलीवूडपटाला दिला होता झटक्यात नकार

बिग बींना बेल बाॅटम घालने पडले महागात, एक उंदीर त्यांच्या पॅटंमध्ये घुसला अन्…

हे देखील वाचा