निर्माती एकता कपूर हिची वेब सीरिज ‘XXX सीझन 2‘च्या अडचणी कमी हाेण्याचं नावच घेत नाहीये. शुक्रवारी (दि. 14 ऑक्टाेबर) सर्वोच्च न्यायालयाने वेब सीरिजमधील ‘आक्षेपार्ह मजकूरा’साठी एकता कपूरला फटकारत ती या देशातील तरुण पिढीचे मन विचलित करत असल्याचे म्हटले. तिच्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याबद्दल तिच्याविरुद्ध अटक वॉरंटला आव्हान देण्यात आले हाेते.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रवीकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, “काही तरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन विचलित करत आहात. ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणते पर्याय देत आहात? उलट तरुणांची मने तुम्ही विचलित करत आहात.”
एकता कपूर (ekta kapoor) हिची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, “पटणा उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी सूचीबद्ध होईल अशी आशा नाही.” ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात कपूर यांना संरक्षण दिले होते.” रोहतगी म्हणाले की, “वेब सीरिज सबस्क्रिप्शननंतरच पाहता येते आणि आम्हाला आमच्या देशात आमच्या आवडीनुसार पाहण्याचे स्वातंत्र्य आहे.”
न्यायालयाने दिले निर्देश
खंडपीठाने एकता कपूरच्या वकिलाला सुचना देत म्हटले की, ‘प्रत्येक वेळी तुम्ही या कोर्टात येता, तर आम्ही त्याचे कौतुक करू शकत नाही. अशी याचिका दाखल करण्यासाठी आम्ही तुमच्यावर खर्च करू. रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही सेवा घेऊ शकता आणि तुमची केस चांगल्या वकिलाकडे देऊ शकता. हे न्यायालय आवाज असलेल्यांसाठी नाही, तर ज्यांना आवाज नाही त्यांच्यासाठी काम करते. ज्या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल, तर या सामान्य माणसाची काय अवस्था होईल याचा विचार करा.”
सन 2020 मध्ये तक्रार दाखल केली हाेती
सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण प्रलंबित ठेवले आणि सुचवले की, उच्च न्यायालयात सुनावणीची स्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक वकील गुंतले जाऊ शकतात. माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरून बिहारच्या बेगुसराय येथील कनिष्ठ न्यायालयाने हे वॉरंट जारी केले होते. ‘XXX सीझन 2’ मधील सैनिकाच्या पत्नीचा समावेश असलेल्या अनेक आक्षेपार्ह दृश्यांबाबत कुमार यांनी 2020 च्या तक्रारीत ही याचिका दाखल केली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्याशी लग्न करशील का?’, अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल होताच चाहत्याच्या कमेंटने वेधले लक्ष
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी संसारापेक्षा करिअरला दिले महत्व, आज जगतायेत ‘असलं’ आयुष्य