Thursday, June 13, 2024

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी संसारापेक्षा करिअरला दिले महत्व, आज जगतायेत ‘असलं’ आयुष्य

बॉलिवूडसारख्या झगमगणाऱ्या दुनियेत प्रत्येकालाच आपले नशिब चमकवायचे असते. ही गलॅमरसने भरलेली इंडस्ट्री नेहमी लोकांना आकर्षित करत असते. मात्र तेवढंच अवघड असतं तिथे आपला ठसा उटवने. अनेक अभिनेत्री आपले स्वप्न साकारण्यासाठी या स्वप्न नगरीमध्ये येत असतात. काहींना संधी मिळते तर काही पडद्यावर योण्यापूर्वीच गायब होतात. तरीही या अभिनेत्रींनी हा कठीण मार्ग निवडला. आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या करिअरसाठी संसाराची देखिल परवा केली नाही.

डिंपल कपाडिया
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) बॉबी चित्रपटाने रातोरात प्रसिद्ध झाली होती. डिंपलने अगदी 16 वर्षाची असतानाच प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना यांच्याशी विवाह केला होता. मात्र, अभिनेताला डिंपलचे चित्रपटात काम करणे आवडत नव्हते त्यामुळे तीअभिनय क्षेत्रापासून लांब झाली. यानंतर तिने 10 वर्षानी राजेश खन्नाचे घर सोडून दिले आणि पुन्हा एकदा अभिनयात करिअर घडवले.

मल्लिका शेरावत
हॉट आणि ग्लॅमरस दिसणारी मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)  तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिला खासकरुन मर्डर चित्रपटासाठी ओळखले जाते. हा चित्रपट खूपच गाजला असून, मल्लिकाने खूप बोल्ड सिन दिले होते. त्यामुळे तिला आयटम सॉंग जास्त मिळत होते. चित्रपटात येण्यापूर्वी तिने करण गिल सोबत लग्न केले होते. मात्र, अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तिने 1 वर्षातच लग्न तोडले आणि मुंबई गाठली. यानंतर ती बॉलिवूड सोबत हॉलिवूड चित्रपटामध्येही झळकली.

चित्रांगदा सिंग
अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) हिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. हिने 2001 मध्ये ज्योति रंधावा सोबत लग्न केले होते. लग्नानंतर चित्रांगदा मुंबईमध्ये राहात होती, आणि पती दिल्लीमध्ये राहात होता. वेगवेगळे राहण्यामुळे दोघांमध्ये चांगलेच वाद पेटले आणि शोवटी 2014 साली दोघांनी घटस्फोट घेतला अभिनेत्रीने तिच्या अभिनय करिअरला निवडले. आतापर्यत चित्रांगदाने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम सारख्या मोठ मोठ्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

हेही वाचा-
– रकुल प्रीत सिंगचा डॅशिंग लूक; पाहा फोटो
‘माझा नवरा मला मारतो…,’ अखेर प्रार्थना बेहेरेने केला नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाली…

हे देखील वाचा