सध्या मराठी चित्रपट जगतात एकापाठोपाठ एक भन्नाट ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि कथा यांवर चित्रपट तयार करण्याची जणू सिनेजगतात स्पर्धाच लागलेली दिसत आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंचाही (kedar Shinde) असाच ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची घोषणा केली आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहीर साबळे यांच्या या भूमिकेसाठी अभिनेता अंकुश चौधरीची (Ankush Choudhary) निवड करण्यात आली आहे. सध्या तो या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो शाहीर साबळेंची वेशभूषा साकारताना दिसत आहे.
दिग्दर्शक केदार शिंदेने महाराष्ट्रदिनी आपल्या नवीन महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची घोषणा केली होती. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता अंकुश चौधरी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. याचाच एक खास व्हिडिओ केदार शिंदेनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये केदार शिंदेनी “चरित्रपट बनवताना कलाकाराने त्या व्यक्ती सारखं दिसणं खूप महत्वाचं असतं ज्याच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय.. अंकुश ला शाहिरांसारखं दाखवण्यासाठी विक्रम गायकवाडांची संपूर्ण टीम, त्यातही महत्वाचं म्हणजे जगदीश येरे ह्यांनी खूप मेहनत घेतली. युगेशा ओंकार हिने वेशभूषेची बाजू सांभाळली पण ह्या सगळ्यांपेक्षा महत्वाची गोष्ट होती शाहीरांचा आत्मा अंकुश मध्ये आणि त्या पोस्टर वरच्या एका फोटो मध्ये उतरवणे.. मेकप, वेशभूषा हुबेहूब होऊ शकते पण जोवर कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडत नाही तोवर योग्य परिणाम साधता येत नाही.. हा परिणाम पोस्टर मधे साधण्यासाठी केलेले पडद्या मागचे प्रयत्न आज शेअर करतोय.” असे म्हणत या पडद्यामागच्या शिलेदारांचे विशेष कौतुक केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा