×

शाहिर साबळेंच्या भूमिकेसाठी अंकुश चौधरी कशाला म्हणणाऱ्यांना निर्माते केदार शिंदेनी दिले सणसणीत उत्तर

मराठी सिनेजगतात सध्या एकापेक्षा एक धमाकेदार नाविण्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या नाविण्यपूर्ण चित्रपटांमध्ये सर्वात जास्त ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यामध्ये सध्या केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या ‘महाराष्ट्र शाहिर’ चित्रपटाची  जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. याबद्दलच केदार शिंदे यांची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. 

सध्या केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर या चित्रपटाची सर्वत्रच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहिर साबळे यांच्या जिवनावर आधारित हा चित्रपट आहे. शाहिर साबळे हे प्रसिद्ध कवी, गितकार, संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या पहाडी आवाजात त्यांनी अनेक गाणी गायली. महाराष्ट्राची लोकधारा द्वारे त्यांनी मराठी संस्कृतीला नविन ओळख मिळवून दिली. या चित्रपटात त्यांच्या याच जिवनाची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

मात्र या भूमिकेसाठी अंकुश चौधरीच्या निवडीवरुन अनेकांनी शंका उपस्थित केली होती. अंकुश चौधरी त्यांच्यापेक्षा खूप वेगळा दिसतो त्यामुळे तो या भूमिकेसाठी योग्य नाही असे मत अनेकांनी मांडले होते. मात्र आता केदार शिंदेने याबद्दलची एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी अंकुश चौधरी आणि शाहिर साबळे यांचा कोलाज केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकुश चौधरी हुबेहूब शाहिर साबळेंसारखा दिसत आहे.

हा फोटो शेअर करत केदार शिंदेने प्रत्येक जण मला विचारतोय की, “अंकुश चौधरी महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य आहे तो खुप वेगळा दिसतो. काहींनी हे पोस्टर पाहून अंकुशला ओळखलं सुध्दा नाही. नीट पाहा, एक फोटो अंकुशचा आहे आणि दुसरा शाहीर साबळे यांचा. ही कमाल विक्रम गायकवाड यांची. जगदिश येरे यांच्याकडून हा लूक निर्माण झाला आहे. युगेशा ओमकार हीने याचे कॉश्चुम केले आहेत, ही सुरूवात आहे. अजून बराच पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण प्रत्येक गोष्ट याच पॅशनने करून हे शिवधनुष्य आम्ही नक्कीच पेलू. आपले आशीर्वाद असू द्यात. श्री स्वामी समर्थ”असा भला मोठा कॅप्शन देत या अंकुश चौधरीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post