Saturday, July 27, 2024

Birthday Special | ‘धर्मा’ चित्रपटाने बदललं प्रकाश झा यांचं नशीब, अजय देवगणलाही त्यांनीच बनवलं ‘सुपरस्टार’

हिंदी चित्रपट क्षेत्रात सामाजिक आणि ज्वलंत प्रश्नांवर आधारित चित्रपट बनवणारे निर्माते कमीच आहेत. प्रेम किंवा रोमँटिक फॅमिली ड्रामा याच विषयावर जास्तीत जास्त चित्रपटांची निर्मिती केली जाते. मात्र याला अपवाद आहेत ते म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा. प्रकाश झा यांच्या चित्रपटांच्या कथा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या आणि समाजाचा आरसा दाखवणाऱ्या असतात. म्हणूनच त्यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत असतात. आज २७ फेब्रुवारी प्रकाश झा यांचा वाढदिवस जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

प्रकाश झा (Prakash Jha) हे हिंदी चित्रपट क्षेत्रातील असे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या चित्रपटातून अनेक सामाजिक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न ते करत असतात. मात्र चित्रपट जगतात नाव कमावणाऱ्या प्रकाश झा यांना पेंटर व्हायचे होते. त्यांचा जन्म १९५२ला बिहारमध्ये झाला. आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी दिल्लीला आले. त्यानंतर मुंबईमध्ये आले असता, त्यांना ‘धर्मा’ चित्रपटाचे शूटिंग पाहण्याची संधी मिळाली. इथूनच त्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक सामाजिक मुद्दयांवर चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी ‘हिप हिप हुर्रे’ चित्रपटातून आपल्या कारकिर्दिला सुरूवात केली. मात्र त्यांचा कल जास्तीत जास्त सामाजिक प्रश्नांवर चित्रपट बनवण्याकडे होता.

गंगाजल
अभिनेता अजय देवगणची भूमिका असलेला ‘गंगाजल’ चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला. चित्रपटाची आगळी वेगळी कथा आणि प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनाचे तेव्हा सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर अजय देवगण आणि प्रकाश झा या जोडीने अनेक सामाजिक प्रश्नांवर चित्रपटाची निर्मिती केली.

अपहरण
प्रकाश झा यांचा ‘अपहरण’ हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. चित्रपटात बिहारमधील अपहरण कांडाची कथा दाखवली आहे. यामध्येही अजय देवगण आणि प्रकाश झा यांच्या कामाचे कौतुक केले जाते. त्याचबरोबर अभिनेते नाना पाटेकर यांनीही यामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

राजनिती
राजकारणाच्या मैदानातील डावपेच आणि कुरघोड्या यांंमुळे सामान्य जनतेची होणारी फरपट याचे भीषण वास्तव या चित्रपटात मांडले होते. चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

सत्याग्रह
२०१० मध्ये करीना कपूर आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सत्याग्रह’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. अशा सामाजिक प्रश्नांवर चित्रपट बनवत प्रकाश झा यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले होते. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांचे विशेष कौतुक केले जाते. त्यांनी राजकारणातही नशीब आजमावले होते, मात्र यामध्ये त्यांना यश मिळू शकले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिला दिग्दर्शकीय सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच दाक्षिणात्य दिग्दर्शक जोसेफ मनु जेम्स यांचे अल्पशा आजाराने निधन
नागराज मंजुळेंच्या नविन गाण्याने घातला धुमाकुळ…एकदा पाहाच

हे देखील वाचा