Wednesday, July 3, 2024

ब्रेकिंग! प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा अपघात, रुग्णालयात दाखल

सिनेविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा अपघात झाला आहे.  ‘इंडियन पोलीस फोर्स’ या आगामी वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान रोहितसोबत ही घटना घडली. सध्या तो हैदराबाद येथील कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या बातमीनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

खरं तर, रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा यावेळी कार चेसिंग सीक्वेन्स शूट करत होता. यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. यानंतर प्रोडक्शन टीमने त्याला तातडीने कामिनेनी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांच्या पथकाने रोहितवर किरकोळ शस्त्रक्रिया केली. तसेच, त्याला त्याच दिवशी डिस्चार्जही देण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

ऍक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो रोहित
रोहित शेट्टी हा जबरदस्त ऍक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याच्या सिनेमात हाणामारी आणि ऍक्शन सीन्स एकदम फिल्मी स्टाईलमध्ये चित्रीत केले जातात. रोहितच्या सिनेमात गाड्या, दुचाकी आणि हेलिकॉप्टर्सद्वारे कलाकारांमध्ये भांडणे होतात. गाड्या आपसात भिडतात, त्या मोडतात आणि नायक त्यावर उभा राहून स्टंट करतानाही दिसतो. सिनेमातील लूकवरून समजते की, सिनेमा रोहितनेच दिग्दर्शिक केला आहे. याव्यतिरिक्त तो टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही जोरदार स्टंट करतो आणि स्पर्धकांकडून करवूनही घेतो.

यावर्षी धुमाकूळ घालणार रोहित
रोहित शेट्टी बॉलिवूडमधील त्याच्या ऍक्शन सिनेमांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. 2022 हे वर्ष रोहितसाठी खास नव्हते. मात्र, 2023 या वर्षात रोहित अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे आणि वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत आहे. नुकताच रोहितचा ‘सर्कस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. आता 2023मध्ये रोहित चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) अभिनित ‘सिंघम 3’, सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित ‘इंडियन पोलीस फोर्स’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘गोलमाल 5’ हे सिनेमे घेऊन येत आहे. या सिनेमांसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Director Rohit Shetty was admitted to Kamineni Hospital)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

बाबो! चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका ‘या’ वेब सीरिज
बॉलिवूडमधील स्पर्धेवर अक्षय कुमार स्पष्टच; म्हणाला, ‘मी नंबर वन होण्याच्या शर्यतीत नाही…’

हे देखील वाचा