Tuesday, July 9, 2024

प्रसिद्ध दिग्दर्शक हरपला! ब्लॉकबस्टर ‘बालिका वधू’ सिनेमाची निर्मिती करणारे मजूमदार काळाच्या पडद्याआड

कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आयुष्यातील कथांवर आधारित सिनेमांची निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजूमदार यांना सोमवारी (दि. ०४ जुलै) देवाज्ञा झाली. त्यांनी कोलकाता येथील एक रुग्णालयात ११ वाजून १७ मिनिटे झाली असताना अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने मजूमदार यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. अनेकजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

तरुण मजूमदार (Tarun Majumdar) यांना शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि. ०३ जुलै) त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले. मजूमदार हे मागील काही दिवसांपासून वयाशी संबंधित आजारांनीही ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनावरील कथा दाखवली रुपेरी पडद्यावर
मजूमदार, मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनावरील कथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी ओळखले जातात. त्यांना आपल्या कामासाठी ४ राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. इतकेच नाही, तर १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

तरुण मजूमदार यांच्या सिनेमांची यादी
भारतीय सिनेविश्वात त्यांनी १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘बालिका वधू’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आहे. या सिनेमाव्यतिरिक्त त्यांनी ‘कुहेली’ (१९७१), ‘श्रीमान पृथ्वीराज’ (१९७४), ‘दादर कीर्ती’ (१९८०), ‘भालोबासा भालोबासा’ (१९८५) आणि ‘अपान अमर अपान’ (१९९०) यांसारख्या सिनेमाने त्यांनी आपल्या सिनेविश्वाचं नाव उंचावलं.

मजूमदार यांच्याबाबत खास बाब अशी की, त्यांची पत्नी संध्या रॉय यांनी मजूमदार यांच्या २० सिनेमात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव

Khuda Hafiz 2 Movie : अभिनेता विद्युत जामवालला पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी, ट्रॅफिक झाले जाम

भेटायला आलेल्या चाहतीला दिले भन्नाट सरप्राईज, विद्युत जामवालच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

विद्युत जामवाल जोडीदार नंदिता महतानीसोबत झाला स्पॉट, पण ‘या’ कारणामुळे ट्रोल झालं जोडपं

हे देखील वाचा