काही चित्रपट असे असतात की, त्याच्या कास्टिंगपासुनंच प्रेक्षक त्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. असाच एक चित्रपट सध्याला बराच चर्चेत आहे. तो चित्रपट म्हणजे विकास बहल दिग्दर्शित ‘ शैतान ‘. या चित्रपटात अजय देवगन , ज्योतिका आणि आर माधवन तिघं एकाच पडद्यावर दिसणार आहेत, यावरुनच अंदाज लावला जावू शकतो की ही कथा एकदम जबरदस्त असणार आहे. यामुळेच प्रेक्षकांकडुन या चित्रपटाबाबत उत्सुकता दिसुन येत आहे. अशातंच आता या फिल्मचा टीजर समोर आला आहे.
काय आहे ‘शैतान ‘
सुपरनॅचरल थ्रिलर ‘शैतान’ची पहिली झलक पाहील्यावर हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढतंच जाणार यात काही शंकाच नाही. आर माधवन या चित्रपटात निगेटीव्ह भुमिकेत दिसणार आहे. टीजरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भागात आर माधवनचा फक्त आवाज ऐकायला येतो आणि हा आवाज, आवाजातील त्यांचा अंदाज आपल्याला सुपरनॅचरल वातावरणाचा फील देतो.
शैतानच्या टीजरमध्ये(Shaitan teaser) आर माधवन बोलत आहे,”म्हणतात की सगळी दुनिया बहीरी आहे, पण सगळे माझं ऐकतात. काळ्याहुनही काळा मी. मोहाचा प्याला मी. तंत्रापासुन श्लोकांचा, मालक आहे तिन्ही लोकांचा. विषही मी, औषधही मी.शतकानुशतके मुकेपणाने पाहात आलेला, मुक साक्षीदारही मी. ”
आर माधवनच्या या कथनासोबत स्क्रीनवर जी चित्र दिसतात त्यात सैतानाचे स्केच, तंत्रसिद्धी विधीची तयारी आणि वूडू बाहुल्यांचा समावेश आहे. काळ्या जादुशी संबंधित या वातावरणात अजय देवगन (Ajay Devgan) आणि ज्योतिका(jyothika ) यांच्या चोहऱ्याची फक्त एक झलक दिसते. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर भयानक भीती पसरलेली दिसत आहे. माधवनच्या(R.madhavan) आवाजातील नरेशनमध्ये पुढे तो म्हणतो,”एक खेळ आहे, खेळणार ?या खेळाचा एकच नियम आहे, मी काहीही बोलेलो तरी तुमची दिशाभुल करुन घेवु नका ! ” शेवटी आर माधवनच्या अर्ध्या चेहऱ्याचा क्लोजअप आहे. त्यात त्याचे असुरी हसणे आहे. ज्यामुळे प्रचंड भीती निर्माण होते.
कधी योणार शैतान
विकास बहल(Director Vikas Bahl) दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर ‘शैतान’ चित्रपट 8 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ज्योतिका मोठ्या ब्रेकनंतर शैतान हा हिंदी चित्रपट करणार आहे. त्याचसोबत आर माधवनदेखील बऱ्याच काळानंतर हिंदी सिनेमात काम करत आहेत. या सिनेमातील त्यांचे पात्र पाहुन तो अजुन एक लक्षात राहण्यासारखा परफाॅर्मनस देणार असल्याचे दिसुन येत आहे.