Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड ‘भारत विरुद्ध इंडिया’, म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी दिली नुपूर शर्मा प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया

‘भारत विरुद्ध इंडिया’, म्हणत विवेक अग्निहोत्री यांनी दिली नुपूर शर्मा प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया

काश्मीर फाईल्स सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे आले आहे. विवेक नेहमीच त्याच्या स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखले जाते. त्यांना त्यांच्या विधानांमुळे आणि व्यक्तव्यांमुळे ते नेहमीच मीडियामध्ये गाजतात. आता नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा एक विधान केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या असलेल्या नुपूर शर्मा यांचे पक्षातून निलंबन कऱण्यात आले आहे. बीजेपीच्या प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात विवादित वक्तव्य केल्यामुळे त्यांना पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

नेहमीच राजकारणावर भाष्य करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी या प्रकरणावर देखील त्यांचे मतं मांडले आहे. विवेक यांनी ट्विटरवर त्यांचे मत मांडताना लिहिले की, “भारत विरुद्ध इंडिया, धर्माच्या या युद्धात भारत भारताला हरवत आहे.” नुपूर शर्मा यांच्या विवादित विधानानंतर उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा पाहायला मिळाली. त्यानंतर नुपूर शर्मा यांनी त्यांच्या विधावर माफी देखील मागितली. त्यांनी सांगितले की, “मी सर्व धर्मांचा आदर करते.”

तत्पूर्वी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाला घेऊन मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी देखील या सिनेमावर त्यांचे मत मांडले होते. मात्र बहुतकरून लोकांना काश्मिरी पंडितांवर अत्याचार करणाऱ्या ९० च्या दशकातील त्या घटनेवर आधारित असलेला हा सिनेमा आवडला.

विवेक अग्निहोत्री यांच्याप्रमाणे इतर अनेक लोकांनी या प्रकरणावर त्याचे मतं मांडले आहे. काश्मीर फाईल्स सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा