Saturday, June 15, 2024

‘पैसा, गाडी, बंगला आणि प्रेम’, सगळं असूनही नेहा कक्कर ‘या’ कारणामुळे जगते ‘टेन्शनवाली लाईफ”

बॉलिवूडमधील नावाजलेली गायिका नेहा कक्कर (neha kakkar)हीने आपल्या मेहनत आणि कलेच्या जोरावर बॉलिवूड संगीत क्षेत्रात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. समस्त तरुण वर्ग हा तिच्या आवाजाचा दिवाणा आहे. नेहा कक्करची गाणी रिलीझ होताच व्हायरल होतात. नुकतेच तीने या गोष्टीचा खुलासा केला आहे की, ‘तिच्याकडे प्रेम, पैसा, कुटुंब सगळं काही आहे, परंतु एका गोष्टीमुळे ती खूपच टेंशनमध्ये आहे.’ काेणती आहे ती गाेष्ट? चला, जाणून घेऊया…

इंडियन आयडॉलच्या मंचावर चंदिगडची स्पर्धक अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणे गायिले. हे गाणे ऐकुन नेहा खूप भावुक झाली. नेहाने सांगितले की,” मला देखील अनुष्कासारखा एन्झाइटी प्रॉब्लेम आहे. एवढंच नाही तर मला थायरॉईड देखील आहे आणि हेच एन्झाईटीचे मुख्य कारण आहे.”

नेहाने सांगितले की तिच्याकडे आता सगळं काही आहे. परंतु तीच्या आजाराने ती खूपच डिस्टर्ब आहे आणि तीला एन्झाईटीचा सामना करावा लागतो.

नेहा कक्कर एक उत्कृष्ट गायिका आहेच, पण याच बरोबर ती मनाने देखील खूप उदार आहे. तिने आताच गीतकार ‘संतोष आनंद’ यांना आर्थिक मदत केली आहे. ‘जिंदगी ना टूठे लडी प्यार कर ले घडी दो घडी’ यांसारख्या गाण्यांना संतोष यांनी संगीत दिले आहे. परंतु सध्या ते आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. इंडियन आयडॉलमध्ये आल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांना आता कायच काम नाहीये, त्यामुळे त्यांना पैशाची कमतरता भासते. त्यांची ही परिस्थिती अजुन नेहा कक्कर खूपच भावूक झाली आणि तिने त्यांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली.

नेहाने 2020 मध्ये रोहनप्रीत सिंग याच्यासोबत लग्न केले आणि दोघेही एकमेकांसोबत खूपच आनंदी आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. (singer neha kakkar getting emotional on the stage indian ideol)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’
नसीरुद्दीन शाह यांनी मिळालेल्या अवॉर्डपासून बनवली आहेत दरवाजाची हँडल्स, काय आहे नेमके प्रकरण? लगेच वाचा

हे देखील वाचा