सन 2022 हे वर्ष आता संपून एक आठवडा झाला आहे. मात्र, मागील वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स‘ या सिनेमाचा समावेश होतो. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जबरदस्त कमाई केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे विवेक अग्निहोत्री आता ‘द व्हॅक्सीन वॉर’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा लॉकडाऊन दरम्यान बनलेल्या व्हॅक्सीन आणि कोव्हिड योद्ध्यांवर आधारित आहे. सध्या एअर इंडिया विमान घटना देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यावर ट्वीट करत अग्निहोत्री चर्चेचे धनी ठरले आहेत.
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एअर इंडिया विमान घटनेवर (Air India Flight Incident) आपले मत मांडले आहे. खरं तर, 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये मद्यपान केलेल्या व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. याप्रकरणी त्याला कोणत्याही कारवाईशिवाय जाऊ दिले गेले होते. त्या आरोपीचे नाव शंकर मिश्रा असे असून त्याला शनिवारी (दि. 07 जानेवारी) सकाळी अटक करण्यात आली. या अटकेपूर्वी अग्निहोत्रींनी याच्याशी संबंधित एक ट्वीट केले, जे काही क्षणातच व्हायरल झाले.
विवेक अग्निहोत्रींचे वक्तव्य?
शंकर मिश्रा (Shankar Mishra) याच्या अटकेपूर्वी एका ट्वीटवर प्रतिक्रिया देत अग्निहोत्री म्हणाले की, “कायदा सर्वांसाठी एकसमान आहे. मग ते अरफा असो किंवा राजदीप. मीडियाच सर्वांमध्ये भेदभाव करतो. मी पूर्ण खात्रीनिशी हे म्हणू शकतो की, जर कोणी खान असता, तर मीडियाने त्याला बळी म्हटले असते. कृपया विचार करा आणि तेव्हाच तुमचे विचार व्यक्त करा.”
Dear @sardesairajdeep,
The law is same for everyone. Be it Arfa or Rajdeep. It’s the media (vulture media, according to you) which discriminates. I am sure if it was a Khan, you would have called him a victim by now. Pl think and reflect. https://t.co/slo2YXIms6— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 6, 2023
सोशल मीडियावर ट्रोल
एअर इंडिया विमानात झालेल्या या घटनेचा खुलासा झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रवाशांसोबतच ड्यूटीवर असणाऱ्या लोकांवर निशाणा साधला गेला. माध्यमांतील वृत्तांनुसार, शंकर मिश्राला दिल्लीच्या संजय नागर भागातून अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी तो त्याच्या बहिणीसोबत राहात होता. इतकेच नाही, तर शंकर मिश्राला त्याच्या वेल्स फार्गो (Wells Fargo) या कंपनीनेदेखील काढून टाकले आहे.
सध्या देशभरात या घटनेवर जोरदार चर्चा रंगली आहे. (director vivek agnihotri reacts to air india flight urination incident accused shankar mishra arrested)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट
बाबो! चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका ‘या’ वेब सीरिज