Friday, April 26, 2024

नेपोटिझमवरून संतापले ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक; म्हणाले, ‘बॉलिवूडनं बाहेरच्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं’

बॉलिवूडमध्ये नेपोटिझम हा एक मोठा मुद्दा आहे. याबद्दल अनेकदा बोलले जाते. चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर अनेकदा नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. यापैकी एक नाव करण जोहरचेही आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने नेपोटिझमवर बोलताना अनेकदा करण जोहरचे नाव घेतले आहे आणि त्याच्यावर नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप देखील लावला आहे. तेव्हापासून हा मुद्दा वारंवार चर्चेत आला आहे. त्यात आता चित्रपट निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेतली आहे. नुकतेच विवेक यांनी नेपोटिझमवर भाष्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) म्हणाले की, “मला वाटते की, 2000 सालापूर्वी बॉलिवूड पूर्णपणे वेगळे होते. ती एक वेगळी जागा होती. बहुतेक लोक बाहेरून आलेले होते. यापैकी जे स्टार्स 2000 सालापर्यंत मोठे स्टार झाले, त्यानंतर त्यांची मुले आली. त्यांना बाहेरच्या लोकांची काही अडचण आहे मला माहित नाही, पण म्हणूनच कदाचित ते प्रवास करत आहेत.”

विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “2000 सालानंतर बॉलिवूडमधील कुटुंबांनी इतरांसाठी दरवाजे बंद केले. या चित्रपट निर्मात्यांनी प्रतिभावान कलाकार आणि बाहेरच्या लोकांचे करिअर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली.” विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, हे अगदी स्वाभाविक आहे. त्यात काही नुकसान नाही, पण बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांचे म्हणणे आहे की, इंडस्ट्रीतील नेपोस्टिकमुळे स्टार्स अपात्र लोकांना प्रोत्साहन देत आहेत.” विवेक अग्निहोत्री स्वत:ला बॉलिवूडचा भाग मानत नाहीत. ते अनेकदा करण जोहर आणि इतर चित्रपट निर्मात्यांना ट्वीटद्वारे टोमणे मारताना दिसतात.

विवेक अग्निहोत्री म्हणाले, “धर्मेंद्र बाहेरचे होते, जीतेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा हे सगळे बाहेरचे होते. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित या देखील बाहेरच्या होत्या. हे लोक यशस्वी झाले. त्यांची मुलं आली, मग दिग्दर्शकांची मुलं आली, मग निर्मात्यांची मुलं आली. या सगळ्यांशी मला काहीही अडचण नाही, पण तुम्ही अयोग्य लोकांना प्रोत्साहन देता, त्याची मला अडचण आहे.”

हेही वाचा- मानलं पाहिजे राव! पाय फ्रॅक्चर होऊनही शिल्पा गरबा काय सोडायची नाय, जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहाच

दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटापासून चांगलेच चर्चेत आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लता दीदींच्या आठवणीत भावूक झाले पंतप्रधान मोदी, अयोध्येतील चौकाला दिले गानकोकिळेचे नाव
जीतेंद्र यांची पत्नी अन् लेक जाणार खडी फोडायला? बिहारच्या न्यायालयाने बजावले अटक वॉरंट

हे देखील वाचा