अनेक जाणकार सांगतात बॉलिवूड हे स्वर्ग नाही नरक आहे. बॉलिवूडमध्ये घडणाऱ्या अनेक घटना आपण पाहत असतो. आपल्या आवडत्या कलाकाराचा आगामी चित्रपट पाहण्यात प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहचलेली असते. अशात बॉलिवूडमध्ये दिसणारी ही रोषणाई अनेक तरुणांना भुरळ पडणारी असते. ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं’ या म्हणीसाठी बॉलिवूड हे एक उत्तम उदाहरण ठरेल. असे मनोरंजन विश्वातीलच काही दिग्गज आणि जाणकार मंडळी सांगतात. बॉलिवूडमध्ये २०२० साली सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर हा सर्व प्रकार पकर्षाने समोर येऊ लागला. यामध्ये अमली पदार्थ आणि अश्लील चित्रपट अशा काही प्रकरणांचा जास्त समावेश आहे. त्यात गुरुवारी (२ सप्टेंबर) सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड हळहळ व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी सोशल मीडियावरुन सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली. हे सर्व सुरू असताना विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ट्वीटने सर्वांना पुन्हा एक मोठा धक्का दिला.
विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ट्विटमध्ये नेमकं आहे तरी काय?
विवेक रंजन अग्निहोत्री हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूंनंतर सर्वत्र शोककळा पसरली असताना विवेक यांच्या ट्वीटने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. विवेक यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, “बॉलिवूडला समजून घेण्यात माझी बरीच वर्षे लोटली. जे तुम्ही पाहताय ते बॉलिवूड नाही. खरं बॉलिवूड त्यांच्या जवळच्या साथींबरोबर असते. याचा खालचा भाग इतका काळा आहे की, एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीला इथे थांबणं फार कठीण आहे. चला, तर मग बॉलिवूडला समजून घेऊ. या अंधारामध्ये तुम्ही तुटलेली स्वप्न, दबलेली स्वप्न आणि पायाखाली चिरडलेली स्वप्न बघू शकता. बॉलिवूड नावीन्यतेचे महाल आहे, तर नावीन्यतेचे स्मशान देखील आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे की,अस्वीकृती ही आपल्यासाठी वाटाघाटीचा हिस्सा आहे.”
BOLLYWOOD – The Inside Story:
I have now spent enough years in Bollywood to understand how it works. What you see is not Bollywood. Real Bollywood is found in its dark allies. Its underbelly is so dark that it’s impossible for a common man to fathom. Let’s understand it:
1/8— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 2, 2021
पुढे ते म्हणाले की, “इथे एवढा मोठा अपमान केला जातो की, एखाद्या मध्यवर्गीयाची स्वप्ने, आशाआकांशा यांना पुरते चिरडून टाकले जाते. एखादी व्यक्ती जेवणाशिवाय जिवंत राहू शकते, परंतु मानसन्मान, आदर, आत्मविश्वास या सर्वांशिवाय नाही.”
बॉलिवूडविषयी त्यांच्या मनामध्ये असलेली प्रतिमा सांगताना विवेक अग्निहोत्री पुढे म्हणतात की, “इथं एवढं जोरात मारलं जातं की, त्यांच्याबरोबर लढण्यापेक्षा हार पत्करावी लागते. जे आपल्या घरी निघून गेले आहेत, ते खरंच खूप भाग्यशाली आहेत. जे इथे राहतात ते आयुष्यातून उठतात. ते यश मिळवतात, पैसे कमवतात, परंतु ते सर्व खोटं असतं, सर्व दिखावा असतो. अनेकजण इथे ड्रग्ज आणि इत्तर नशेच्या आहारी गेलेले असतात. आता त्यांना पैशांची गरज असते. एवढ्या पुढे आल्यानंतर पुन्हा मागे जाणे अशक्य असते. त्यामुळे ते जिवंत पुतळे बनलेले असतात. ते एका स्टारप्रमाणे राहतात, त्यांच्यासारखे कपडे घालतात, त्याच्यासारखे बोलतात त्यांना एका स्टार प्रमाणेच वागावं लागत परंतु ते स्टार नसतात.”
यानंतर पुढे ते म्हणाले ,”इथे तुम्हाला तुमची मानसिकता एका अतिरेक्याप्रमाणे करून घेणे गरजेचे आहे. असा अतिरेकी जो बंदुकीत गोळ्या न घालता दहशत निर्माण करेल. इथे पावलापावलास अपमान सहन करावा लागतो. काळ्या भुयाराप्रमाणे येथील परिस्थिती आहे. जितके आपण आत जाणार, तेवढाच जास्त अंधार वाढत जाणार. इथे तुम्ही ओरडलात, रडलात काही केले, तरीही कुणालाच काहीच फरक पडत नाही.”
आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये विवेक म्हणतात की, “तुम्ही तुमच्या स्वप्नांना गाडून टाकता. तुमचा मृत्यू तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहत असता. बाकीचे लोक तुमच्या पार्थिवावर नाचत असताना दिसतात. ते आनंद साजरा करत असतात. या सर्वांमुळे तुम्ही एक जिवंत मृतदेह घेऊन वावरत असता. यामध्ये मोठी शोकांतिका ही आहे की, फक्त तुम्हालाच माहित असते की, तुम्ही एक जिवंत मुडदे आहात. प्रेक्षकांना तुम्ही स्टार वाटता आणि एक दिवस या सर्वांचा अंत होतो आणि अखेर तुम्ही मरता. त्यांनतर जगाला खरे कारण कळते. समाप्त!”
विवेक यांच्या या ट्वीटमुळे आता पुढे काय होणार, नेमक्या कोणत्या घड्या आता उलगडणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नेटकरी या ट्वीटचा सिद्धार्थच्या मृत्यूशी संबंध लावत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन
-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल
-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’










