दिग्गज चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री हे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे आणि लिखाणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ‘द कश्मीर फाईल्स‘ या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आले होते, त्यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती, पण या चित्रपटामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते, त्यामुळे चित्रपट जोरदार चर्चेचा विषय बनला होता. विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाद्वारे बॉलिवूडला टोमणा मारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) नेहमी बॉलिवूडलमधील कलाकारांना त्यांच्यातील कमतरतेची जाणीव करून देताना दिसत आहेत. तसेच, सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करून बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ते देशाच्या दोन मोठ्या समस्या, ‘भ्रष्टाचार आणि नेपोटिझम’ या विषयावर बोलताना दिसत आहेत. मोदी यांच्या या व्हिडिओला शेअर करून अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर निशाना साधला आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “नैतिकता भ्रष्टाचार, भाऊ-भाचा आणि हिंदुफोबिया हे या तीन गोष्टी बॉलिवूडला खराब बनवत आहेत.” त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे लोक त्यांना ट्रोल करत आहेत. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, “तिरस्कारिक चित्रपट बनवून तुमच्या मनातही तिरस्कार भरला आहे, आता तुम्ही लव्ह स्टोरीवर काम करा.” आणखी एकाने लिहिले आहे की, “आता तुम्ही पण निर्णय घ्या की, तुम्ही तुमच्या मुलांनाही बॉलिवूडमध्ये येऊ देणार नाही, भाऊ-भाचा या वादावर विरोध करण्यासाठी तुमच्याद्वारे दिलेल्या विधानाचे सन्मान करने गरजेचे आहे.”
Moral Corruption, Lethal Nepotism & Hinduphobia – Three of Bollywood’s biggest evils. https://t.co/nuve1bG6K9
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 16, 2022
नेपोटिझमवर निशाणा साधण्याची ही विवेक यांची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी अभिनेता आमिर खान याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावरही आपला निशाणा साधत त्यांना ट्वीट केले होते. लाल सिंह चढ्ढा या चित्रपट प्रदर्शनावेळी बॉलिवूड कलाकारांवर ट्विटरवर टीका केली होती. त्यांनी लिहिले होते की, “जो स्वत: 60 वर्षाचा आहे आणि याला त्याच्यापेक्षा लहान वयाच्या मुलीसोबत रोमान्स कराण्यासाठी उत्सुक आहेत.”
बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका करत असताना विवेक यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “चित्रपटामध्ये गुणवत्ता या विषयाला तर विसरुनच जा. जेव्हा 60 वर्षांचा अभिनेता 20-30 या वयोगटातील मुलींसोबत रोमान्स करण्यासाठी उत्सुक आहेत तर, तरुण दिसण्यासाठी फोटोशॉपचा उपयोग करत आहेत, तर बॉलिवूडमध्ये काहीतरी गडबड चालू आहे. तरुण आणि कूल दिसण्याच्या भानगडीत बॉलिवूडला नष्ट केले आहे आणि याच्यासाठी फक्त एकच माणूस जबाबदार आहे.”
विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडमधील कलाकारांविषयी आपला आक्रोश व्यक्त केला आहे, आणि सोबतच काहीतरी गडबड असल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ‘या’ एव्हरग्रीन गाण्याला ‘टकाटक २’मध्ये ग्लॅमर स्पर्श
पॅपराजींमुळे शहनाजला लागला हजार रुपयांचा चुना; म्हणाली, ‘तुमच्यामुळंच झालंय हे…’
शूटिंगवेळी हॉस्पिटलमधून ‘या’ अभिनेत्याला घेऊन धावताना दिसला थालापती विजय, व्हिडिओ जोरदार व्हायरल










