Saturday, June 29, 2024

दुःखद! ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

२०२० हे वर्ष संपत आले तरी वाईट बातम्या काही संपायच्या नाव घेत नाही. एकामागोमाग एक अशा कलाकारांच्या मृत्यूच्या बातम्या येतच आहे. ‘लव्ह, सेक्स और धोका’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.

आर्या बॅनर्जीने बॉलीवूडमध्ये दिवाकर बॅनर्जीच्या ‘लव्ह, सेक्स और धोका’ आणि मिलन लुथरियाच्या ‘द डर्टी पिक्चर’ या दोन सिनेमात झळकलेले अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दक्षिण कोलकाता मध्ये असलेल्या जोधपूर भागात तिच्या राहत्या घरी आर्या मृत अवस्थेत सापडली. सूत्रांच्या माहिती नुसार सकाळी आर्याची मोलकरीण कामासाठी आली असता बेल वाजवून, मोबाईलवर फोन करून सुद्धा आर्या दरवाजा उघडत नव्हती. तिने शेजारी पाजारी चौकशी करूनदेखील तिला काही समजले नाही मग तिने थेट पोलिसांना बोलवले. पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आर्या तिच्या रूमच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात होती, नाकातून रक्त आणि तोंडातून उलटी आलेली होती. पंचनामा करून आर्याची बॉडी पोस्टमोर्टम साठी पाठवली.

आता आर्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे. पोस्टमार्टमचे रिपोर्ट आल्यानंतरच पुढील तपासाला दिशा मिळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. आर्याच्या नोकरानीच्या सांगण्यानुसार सुर्याकडे कोणाचेही जास्त येणे जाणे नव्हते. तिच्याकडे फक्त एक कुत्रा पळाला होता. आर्या बॅनर्जीही प्रसिद्ध सितारवादक निखिल बॅनर्जी यांची लहान मुलगी आहे.

आर्याने तिच्या अभिनयाची सुरुवात राजकुमार राव आणि नुसरत बरुचा अभिनित, दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह, सेक्स और धोका’ या सिनेमापासून केली. त्यानंतर तिने विद्या बालन, नसरुद्दीन शहा, इम्रान हाशमी, तुषार कपूर अभिनित ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये तिने शकीला नावाची भूमिका साकारली होती. शिवाय तिने या सिनेमात ‘हनिमून की रात’ या गाण्यावर विद्या सोबत डान्स देखील केला होता.

हे देखील वाचा