अभिनेत्री दिशा परमार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच तिने स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बीचवर असल्याचे दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताच क्षणीच व्हायरल झाले. हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. दिशा अलीकडेच तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये सुट्टी इन्जाॅय करताना दिसत आहे.
दिशा आणि राहुल दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. दिशाने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून तिचे आणि राहुलचे काही फोटो शेअर केले आहे. दिशा या फोटोमध्ये बोल्ड अवतारात दिसत आहे. दिशाने या नविन फोटोशूटमध्ये बिकिनी परिधान केली आहे. अभिनेत्री गुलाबी आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये सुंदर पोझ देताना दिसत आहे. तसेच तिने केसही मोकळे सोडले आहे. तिचे हे बीचवरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
दरम्यान १६ जुलै रोजी ‘बिग बॉस १४’ स्पर्धक आणि गायक राहुल वैद्यने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारशी लग्न केले. सध्या हे जोडपं तुफान चर्चेत आहे. राहुल दिशा दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. नुकतेच राहुलचे इंस्टाग्रामवर २ मिलियनहून अधिक फॉलोव्हर्स झाले आहेत.
दिशा परमारविषयी बोलायचे झाले, तर दिशा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि माॅडेल आहे. दिशा आणि राहुल यांनी नुकतंच लग्नानंतर प्रथमच गणेश चतुर्थी साजरी केली. सध्या ती ‘बडे अच्छे लगते हैं २’ या शोमध्ये काम करत आहे. दिशा आणि नकुलची जोडी शोमध्ये खूप पसंत केली जात आहे. दुसरीकडे, राहुल ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये दिसला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब
-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा
-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या