बॉलिवूडमध्ये आजच्या घडीच्या जवळपास सर्वच अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. सर्वच अभिनेत्री चित्रपटांमध्ये जरी सध्या भूमिका साकारत असल्या तरी सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा हटके अंदाज पाहायला मिळतो. सोशल मीडियावर या अभिनेत्री एकापेक्षा एक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. दिशा पटानी ही अशीच एक अभिनेत्री आहेत जे सोशल मीडिया अकाऊंट उघडून पाहिले तर आपल्याला तिचे असंख्य बोल्ड फोटोज पाहायला मिळतील. दिशा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर नेहमीच आग लावत असते. पुन्हा एकदा दिशाने तिच्या बोल्ड फोटोनी धमाका केला आहे.
दिशा पटानीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिशाने बेज रंगाची बिकिनी घातली असून, यात ती अतिशय मादक दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिशा चिल करताना दिसत असून, पहिल्या फोटोमध्ये ती आरशासमोर पोज देत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती एका बाजूने पोज देत आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज फॅन्सला आणि नेटकऱ्यांना चांगलाच आवडत आहे. या फोटोना तिने कॅप्शनमध्ये दिले नसले तरी फायर ईमोजी पोस्ट केली आहे. समुद्र किनारी दिशाने तिच्या लुक्सने चांगलीच आग लावली आहे. दिशाच्या या फोटोंवर नेटकरी भरभरुन कमेंट्स करत असून, तिच्या बोल्ड लुकबद्दल तिचे कौतुक करत आहे.
दिशाच्या एका फॅनने लिहिले, ‘फायर’, दुसऱ्याने लिहिले, ‘वाह क्या बात है’, याशिवाय तिच्या या फोटोवर अनेक हार्ट ईमोजी, फायर ईमोजी अनेकांनी पोस्ट केल्या आहेत. दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न’ आणि ‘केटीना’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी दिशाचा सलमान खानसोबतचा ‘राधे’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. नुकतीच तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे.