Thursday, April 18, 2024

बॉबी देओलला नकारात्मक भूमिकेत पाहून तुटले होते धर्मेंद्र यांचे हृद्य, आईने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

अभिनेता बॉबी देओल (Boby Deol)  सध्या त्याच्या लव हॉस्टेल या चित्रपटातील भूमिकेने चांगलाच चर्चेत आला आहे, या चित्रपटात त्याने साकारलेली खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली होती. अभिनेता सलमान खानपासून ते हिंदी चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी त्याच्या या अभिनयाचे कौतुक केले होते. मात्र अभिनेता बॉबी देओलच्या घरच्यांना मात्र त्याच्या अशा प्रकारच्या भूमिका अजिबात आवडत नसल्याचा खुलासा खुद्द बॉबी देओलने केला आहे, काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

अभिनेता बॉबी देओलची हिंदी चित्रपट जगतातील विस्कटलेली घडी पून्हा एकदा पुर्ववत व्हायला सुरूवात झाली आहे. बराच काळ चांगला चित्रपट मिळत नसल्याने बॉबीचे करिअर संपले की काय अशीच चर्चा सगळीकडे रंगली होती. या अपयशाने तो डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.मात्र अभिनेता सलमान खान त्याच्यासाठी तारणहार बनला आणि रेस ३ चित्रपटात मिळालेल्या भूमिकेने बॉबीची गाडी पून्हा एकदा रूळावर आली.

यानंतर त्याची आश्रम बेबसिरीजही चांगलीच गाजली. यामध्ये त्याने साकारलेली नकारात्मक भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र त्याच्या या भूमिकेबद्दल त्याच्या घरच्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हेतर त्याला अशा प्रकारच्या भूमिका साकारण्यासही मनाई केली होती. याचा खुलासा बॉबी देओलने एका मुलाखतीत बोलताना केला होता.

याबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाला की, “माझ्या आश्रम वेबसिरीजनंतर भेटले तेव्हा मी त्यांना माझ्या भूमिकेबद्दल विचारले असता त्यांनी मी तुला अशा भूमिकेत पाहू शकत नाही, मला माहितेय तु कलाकार आहेस,तुला अशा वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात. मात्र अशा प्रकारच्या भूमिका साकारणे बरोबर नाही.सोबतच त्यांनी आपले उदाहरण देताना माझ्या आईनेही अशा प्रकारच्या भूमिका साकारण्यास मनाई केल्याचे सांगितले.” सोबतच धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच बॉबीच्या आईला म्हणजेच प्रकाश कौर यांनाही त्याच्या अशा भूमिका आवडत नसल्याचे त्याने सांगितले. “कोणत्याच आईला आपल्या मुलाने खलनाकाच्या भूमिका साकाराव्या असे वाटत नाही” असेही तो यावेळी म्हणाला. त्याचबरोबर त्याच्या आजीनेही धर्मेंद्र यांना अशा प्रकारच्या भूमिकेसाठी नकार दिला होता अशी आठवणहीव त्याने बोलून दाखवली.

 

हे देखील वाचा