Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड केवळ ‘पुष्पा’ अन् ‘लायगर’च नव्हे, तर ‘या’ बहुचर्चित चित्रपटांनाही दिशा पटानीने दिलाय नकार

केवळ ‘पुष्पा’ अन् ‘लायगर’च नव्हे, तर ‘या’ बहुचर्चित चित्रपटांनाही दिशा पटानीने दिलाय नकार

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) लवकरच जॉन अब्राहम (John Abraham) आणि अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. दिशा केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही, तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. मात्र, आज आपण दिशाच्या करिअर फ्रंटबद्दल बोलू. जाणून घेऊया की अभिनेत्रीने कोणत्या बॉलिवूड चित्रपटांना नाही म्हटले होते.

या यादीत पहिला क्रमांक ‘पुष्पा’ या चित्रपटाचा आहे, ज्यामध्ये दिशा पटानीला ‘ऊ अंटवा’ हे आयटम साँग ऑफर करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशाने हे गाणे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अभिनेत्री यात समंथा (Samantha Ruth Prabhu) दिसली.

यातील दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे विजय देवरकोंडाचा (Vijay Devarkonda) ‘लायगर’. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट सर्वप्रथम दिशाला ऑफर करण्यात आला होता. परंतु अभिनेत्रीला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि तिने या चित्रपटासाठी नाही म्हटले. ‘लायगर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बातमीनुसार, दिशाने ‘मिशन मंगल’ चित्रपटासाठीही नकार दिला होता. अनेक अभिनेत्रींनी सजलेल्या या चित्रपटात तिने दिसावे, असे दिशाला वाटत नव्हते असे बोलले जाते. त्याचवेळी दिशाने ‘मर्डर ४’ हा आणखी एक चित्रपट नाकारला आहे. बातम्यांनुसार, यात दिशासोबत अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा