BIRTHDAY SPECIAL : जेव्हा १९ वर्षीय दिशा पटानीने दिले होते पहिले ऑडिशन; ओळखणेही झाले कठीण

बॉलिवूडमधील ‘नॅशनल क्रश’ म्हणजे दिशा पटानी. (disha patani) दिशा ही बॉलिवूडमधील अत्यंत सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे हास्य पाहून तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल. चित्रपटापासून ते जाहिरातींपर्यंत दिशाने तिची छाप पाडली आहे. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या बोल्ड फोटोमुळे ती खूप चर्चेत असते. जाहिरात क्षेत्रातही तिने तिचे चांगलेच नाव कमावले आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. रविवारी (13 जून) दिशा आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशाचा जन्म 13 जून, 1992 रोजी झाला. यानिमित्त तिचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. ती एका कोल्ड क्रीमसाठी ऑडिशन देताना दिसत आहे. त्यावेळी ती केवळ 19 वर्षांची होती. तिचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते खूप हैराण झाले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये दिशाला ओळखणे देखील अवघड आहे.

दिशा आता खूप बदललेली दिसत आहे. तिच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत बदल झालेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा प्रोफेशनल लूकमध्ये दिसत आहे. यांनतर ती वेगवेगळ्या पोशाखात ऑडिशनच्या ओळी बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या वाढदिवसानिमित्त वेगाने व्हायरल होत आहे. तिचे सगळे चाहते या व्हिडिओचे खूप कौतुक करत आहेत.

दिशाने तिच्या करिअरची सुरुवात तेलुगुमधील ‘लोफर’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात ती ‘वरुण तेज’सोबत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून प्रवेश केला. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. सुशांतने या चित्रपटात धोनीचे पात्र निभावले होते, तर दिशाने त्याच्या प्रेयसीचे पात्र निभावले होते.

दिशा ही बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत असलेल्या तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केले जाते. केवळ पडद्यावरच नाही, तर वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. त्या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही, पण त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जाते. तसेच सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात.

दिशा केवळ एक सुंदर अभिनेत्री नाही, तर एक ऍप डेव्हलपर आहे. तिने एक ऍप डेव्हलप केले आहे. ज्याद्वारे ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचा हा ऍप प्ले स्टोअरवर देखील आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘एमएस धोनी’, ‘बाघी 2’, ‘मलंग’, ‘भारत’ आणि ‘राधे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हेही नक्की वाचा-

Latest Post